|

दोन विमाने आकाशात थेट समोरोसमोर, ममता बॅनर्जी मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावल्या

ममता दीदी
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका मोठ्या विमान अपघातामधून थोडक्यात बचावल्या आहेत. ममता दीदी या कोलकात्यामध्ये काही महत्त्वाच्या बैठका पार पाडून विमानाने निघाल्या होत्या.

पण विमान प्रवासादरम्यान आकाशामध्ये दोन विमाने आमनेसामने आली. पण सुदैवाने वैमानिकांच्या प्रसंगावधाने मोठा अपघात टळलेला आहे. त्यामुळे बंगालच्या लाखो नागरिकांचा आवाज असलेल्या ममता दीदी या सुदैवाने मोठ्या दुर्घटनेपासून बचावल्या आहेत.

ममता बॅनर्जी यांनी स्वत: या घटनेबाबतची माहिती दिली आहे. “माझ्या विमानासमोर अचानक दुसरे विमान आले. दहा सेकंद जर विमान त्याचगतीने पुढे चालत राहिले असते तर त्यांची समोरासमोर टक्कर झाली असती. पायलटच्या कार्यक्षमतेमुळे मी वाचली.

या घटनेवेळी विमान 6 हजार फुट खाली उतरलं असतं. त्यामुळे माझ्या पाठीवर आणि छातीला दुखापत झाली. याशिवाय मला अद्यापही वेदना होत आहेत”, अशी प्रतिक्रिया ममता दीदींकडून देण्यात आली आहे.

संबंधित प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असून पश्चिम बंगाल सरकारने याप्रकरणाबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारने डीजीसीएला संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ममता यांच्या चार्टर्ड फ्लाईटने घेतलेल्या मार्गासाठी मंजूरी देण्यास आली होती का, याची आता शहानिशा होणार आहे. तसंच या प्रकरणामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे ममता दीदी यांच्यासोबत अशीच काहिशी घटना दोन दिवसांपूर्वीदेखील घडली होती. त्या वाराणसी येथून चार्टर्ड फ्लाईटमधून निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या विमानावर दगडफेक झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांचे विमान नेताजी सुभाषचंद्र आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आलं होतं.

ताज्या बातम्या –

पोलीस आयुक्तांकडून महिला पोलिसांना गिफ्ट, आता फक्त आठ तासांची ड्यूटी!

शिवसेनेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर; उद्धव ठाकरे संतापले, सेनेच्या आमदारावर कारवाई होणार?


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *