बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी, ओपिनियन पोलचा अंदाज
कोलकत्ता : देशभरातील ५ राज्यात या महिन्यात निवडणुका होत आहेत. यासाठी सर्व पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. पश्चिम बंगाल वर सर्व देशाचे लक्ष लागले आहे. भाजप कडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ठाण मांडून बसले आहेत.
राष्ट्रवादी कॉन्ग्रेच्व अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा आसाम सोडले तर भाजपची सत्ता इतर ४ राज्यात येणार नसल्याचे भाकीत व्यक्त केले होते. ओपिनियन पोलचा अंदाज आला आहे. त्यात पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बनर्जी यांचे सरकार बनेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एकीकडे तृणमूल कॉंग्रस मधील बडे नेते पक्षाला राम राम ठोकून भाजप मध्ये सामील होत आहेत. मात्र, ओपिनियन पोलचा मध्ये ममता दीदींची जादूही कायम असल्याचे दिसत आहे. ओपिनियन पोलने दर्शविलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल कॉंग्रेसचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, सध्या तीन आमदार असणारा भाजप प्रमुख विरोधी पक्ष असू शकतो. टीएमसीला ४३.१ टक्के, भाजपला ३८.८ टक्के, डाव्यांच्या आघाडीला ११.७ टक्के तर इतरांना ६.४ टक्के मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालचा विकास ममता बनर्जी करतील असा ५७ टक्के लोकांना विश्वास असल्याचे ओपिनियन पोलचा मधून समजले आहे.