|

राहुल गांधी यांना पक्षप्रमुख करा

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

 युवा काँग्रेसचा ठराव मंजूर

दिल्ली: साधारण दोन वर्षापासून कॉंग्रेसला अध्यक्ष नाही. १९ लोकसभेत कॉंग्रेस पक्षाला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून कॉंग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे. सध्या सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष आहे. आणि पुढच्या महिन्यात ५ राज्यातील विधानसभेसाठी निवडणुका होत आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे द्यावीत यासाठी एक गट आग्रही भूमिका घेत आहे. नुकतीच भारतीय युवा कॉंग्रेसने राहुल गांधी यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा ठराव मंजूर केलाय. राष्ट्रीय कार्यकारिणीने हा ठराव मंजूर केलाय, ज्यामध्ये या निर्णयामुळे पक्ष मजबूत होईल आणि देशभरातील कार्यकर्त्यांना उत्साह येईल असं म्हटलं आहे.

भारतीय युवा कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने संयुक्तपणे हा ठराव मंजूर करण्यात आलं आहे. सोमवारी युवा कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. काही आठवड्यांपूर्वी दिल्ली प्रदेश कॉंग्रेस आणि छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेसनेही असेच प्रस्ताव मंजूर केले होते.

नुकतेच गुलाम नबी आझाद हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी जम्मू मध्ये शांती संमेलन घेतले होते. यावेळी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कॉंग्रेसच्या जेष्ठ २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष असावा अशी मागणी केली होती. आमचा राहुल गांधी यांना विरोध नसून कॉंग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष द्यावा अशी मागणी करणारे पत्र त्या नेत्यांनी लिहिले होते. तसेच अध्यक्ष हा नेहमी उपलब्ध असायला हवा अशी सुद्धा मागणी पत्रात केली होती. मात्र, त्या पत्रानंतर मोठा गदारोळ उडाला होता. पत्र लिहिणाऱ्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण, मनिष तिवारी, मिलिंद देवरा आदी नेत्यांचा समावेश होता.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *