|

माही-साक्षीची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळीये…

महेंद्रसिंग धोनी
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 4 जुलै रोजी लग्नाचा वाढदिवस आहे. धोनी आणि साक्षीने 4 जुलै 2010 रोजी डेहराडूनमध्ये लग्न केले होते. यावेळी लग्नामध्ये महेंद्रच्या अगदी जवळचे लोक उपस्थित होते. धोनीची लव्हस्टोरी त्याच्यावर बनलेल्या चित्रपटापेक्षा खूपच वेगळी आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी ही जोडी क्रिकेट जगतात खूप प्रसिद्ध आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षीची लव्हस्टोरी संपूर्ण देशाला माहीत आहे. धोनीच्या बायोपिक बॉलीवूड चित्रपट ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये हे चित्रित करण्यात आले आहे. मात्र, माही-साक्षीची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. चला तर त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्य जाणून घेऊया नेमके काय घडले ते…

धोनी आणि साक्षी एकमेकांना लहानपणापासून ओळखत असे

धोनी आणि साक्षी दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. त्यां दोघांचे वडील रांचीच्या मेकॉनमध्ये एकत्र काम करत असे त्यावेळी हे दोघेही एकाच शाळेत जायचे. पण नंतर साक्षीचे कुटुंब डेहराडूनला शिफ्ट झाले.

कोलकाता येथे 10 वर्षांनी दोघांची भेट

अन् त्यानंतर 2007 मध्ये कोलकाता येथे जवळपास 10 वर्षांनी दोघांची भेट झाली. टीम इंडिया कोलकात्याच्या ताज बंगालमध्ये थांबली होती. यादरम्यान साक्षी येथे इंटर्नशिप करत होती. मॅनेजर युधाजित दत्ता यांनी साक्षीची धोनीशी ओळख करून दिली. जिथे दोघांची भेट झाली.

युधाजित दत्ता हा देखील साक्षीचा चांगला मित्र होता. या भेटीनंतर दोघेही मार्च 2008 मध्ये डेट करू लागले. त्याच वर्षी मुंबईत झालेल्या धोनीच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही साक्षीने हजेरी लावली होती.

पहिल्या भेटीनंतर माहीने हॉटेलचे मॅनेजर दत्ता यांना साक्षीचा नंबर मागितला आणि तिला मेसेज केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साक्षीला विश्वास बसत नव्हता की, एवढा प्रसिद्ध क्रिकेटर तिला मेसेज करत आहे. या भावी जोडप्याच्या मैत्रीची ही सुरुवात होती.

2010 मध्ये लग्न बंधनात अडकले

दोन वर्षांनंतर 2010 मध्ये धोनी आणि साक्षी लग्न बंधनात अडकले. या जोडप्याला 2015 मध्ये एक मुलगी झाली, तिचे नाव जीवा आहे. धोनी नुकताच जीवासोबत एका जाहिरातीत दिसला होता.

महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये आहे. अलीकडेच साक्षीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याची माहिती दिली होती. धोनी आपला वाढदिवस लंडनमध्येच साजरा करणार आहे. त्याचबरोबर माहीचा वाढदिवसही 7 जुलै रोजी आहे.

अधिक वाचा :

‘मशहूर इश्क़ की कहानी’, …अन् अशाप्रकारे रणदीप एकमेकांच्या प्रेमात पडले !


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *