‘आपल्यासारख्या महाराष्ट्र पुत्राने राज्याची प्रतिमा…’ आरोग्यमंत्र्यांचा प्रकाश जावडेकरांना टोला

मुंबई: केंद्र सरकारतर्फे लसीकरण वाटप करताना महाराष्ट्राशी कसा दुजाभाव केला जातो याची आकडेवारी राज्य सरकारने समोर आणली. त्यानंतर प्रकाश जावडेकरांनी ट्वीट करुन महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत राजकारण करु नये असे ट्वीट केले. याला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलंय.
महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत राजकारण करु नये. आजच्या तारखेपर्यंत १ कोटी ६ लाख १९ हजार १९० लसी महाराष्ट्राला पोहोचल्या. यातील ९० लाख ५३ हजार ५२३ लसी वापरण्यात आल्या. ६ टक्के लस फुकट गेली. ७ लाख ४३ हजार २८० लस पाईपलाईनमध्ये आहे. साधारण २३ लाख लस उपलब्ध असल्याच आकडेवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
Maharashtra Govt should not play politics over vaccination. Here are the facts: Total number of COVID vaccine supplied to State till date
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 7, 2021
– 1,06,19,190 ;
Consumption – 90,53,523 (of which 6% wastage – over 5L)
Vaccine in pipeline – 7,43,280. Dosage available – nearly 23 lakhs
लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय असा टोला राजेश टोपेंनी लगावला. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे असे ते यावेळी म्हणालेत. आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही अपेक्षा टोपेंनी व्यक्त केली.
आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा.
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 8, 2021
आकडेवारी
राज्यात परवा ५६२८६ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि काल नवीन ३६१३० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २६४९७५७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५२१३१७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.०५ % झाले आहे.