Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचामहाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही, महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत...

महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही, महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल

शिवसेनेने ‘महाराष्ट्र दिनी’ सोडला मोदी सरकावर ‘बाण’

मुंबई : संपुर्ण राज्य आज १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन साजरा करत आहे. देशासह राज्यावर सुद्धा कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवसेनेने आज मोदी सरकारवर ‘सामना’ च्या अग्रलेखातून जोरदार टिका केली आहे. यामध्ये ”महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही, महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल” असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकार शिवसेनेने आपला बाण सोडला आहे.

”संकटाशी लढण्याची मोठी परंपररा हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राने कधीच स्वाभिमानासाठी तडजोड स्वीकारली नाही. महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री व सरकार असल्याने दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करीत आहेत. पण महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल”. असा जोरदार घाणाघात शिवसेनेकडून मोदी सरकारवर करण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्र ताठ कण्याने लढतो आहे याकाळात दिल्लीकडून होल असलेल्या अन्यायाचा उल्लेख करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

राज्याचे लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबले

देशात कोरोना लसीकरण चालू असून १ मे पासून १८ ते ४ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र राज्यात केंद्राच्या आडमुठेपणामुळे राज्यात लसीकरण थांबले आहे. तसेच औषधांचा पुरवठा, इंजक्शन, ऑक्सीजन तुटवडा जाणवत आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला आर्थिक प्राणवायूचा पुरवठा केला त्याच राज्याच्या वाट्याला ही वेळ सरकारने आणली आहे. महाराष्ट्रात काहीही करुन राजकीय व आर्थिक गोंधळ निर्माण करुन त्यास बदनाम करण्याचे कारस्थान केले जात आहे. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्रातशी वैर काही संपलेले नाही. मात्र महाराष्ट्राच्या हक्काचे व न्याय्य वाट्याचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले. अशी भावना व खंत यावेळी शिवसेनेने केली आहे.

मुंबई शहराचे महत्व करण्याचा हेतू
मुंबई शहराचे महत्व कमी करण्यासाठी येथील अनेक प्रकल्प व योजना गुजरातला नेल्या जात आहेत. यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडण्याचा त्यांच्या हेतू आहे. पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पंडित नेहरू प्रतापगडावर आले, तेव्हा त्यांच्या समोर निधड्या छातीने महाराष्ट्र उभा राहिला होता. महाराष्ट्राला इतिहास आहे, म्हणून तो टिकला आहे. त्यामुळे कितीही संकटे आले तरी महाराष्ट्र खंबीर असल्याचा विश्वास शिवसेनेकडून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments