|

महाराष्ट्र कॉंग्रेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करणार ‘इतक्या’ कोटीची मदत

maharashtra congress
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : महाराष्ट्र कॉंग्रेसने एक महत्वाचा निर्णय घेतला असून यामुळे कोरोना संकटाच्या काळात राज्याला मोठी आर्थिक मदत होणार आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घोषणा केली आहे. १ मे पासून होणाऱ्या १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकारला करावे लागणार. त्यात राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. साहजिकच यामुळे राज्याचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. याचा विचार करून राज्यातील कॉंग्रेसच्या सर्व आमदारांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
याच बरोबर बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहेत. तसेच स्वतः बाळासाहेब थोरात यांनी आपले एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे सांगितले आहे.
विधानसभेत कॉंग्रेसचे ४४ आमदार आहेत तर विधानपरिषदेत १० आमदार आहे. प्रत्येक आमदाराला मानधनापोटी महिन्याला मूळ वेतन ६७ हजार, महागाई भत्ता ८८ हजार आणि भत्ते असे धरून साधारण १ लाख ८३ हजार ४४० रुपये मिळत असतात. कॉंग्रेसच्या एकून आमदारांनी एक महिन्याचे वेतन १ कोटी ६७ हजार ७६० रुपये, बाळासाहेब थोरात यांना वर्षभरात वेतनपोटी मिळणारे २२ लाख ३७ हजार २८० रुपये आणि महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वतीने ५ लाख असे एकून १ कोटी २८ लाख ५ हजार रुपये कॉंग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली जाणार आहे.
राज्यात २८८ विधानसभा आणि विधानपरिषदेत ६६ (राज्यपाल नियुत १२ बाकी आहेत) असे एकून ३५४ आमदार आहेत. राज्यात आमदारांना मिळणारे वेतन आणि भत्ते हे ऑगस्ट २०१६ पासून लागू करण्यात आले आहे. राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदाराला दरमहा १ लाख ८३ हजार ४४० रुपये एवढे वेतन व भत्ते मिळतात. याशिवाय आणखी काही सोई सुविधा सुद्धा मिळतात. कॉंग्रेसच्या आमदारांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *