Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचामहाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीने मानले अतुल सावे यांचे आभार

महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीने मानले अतुल सावे यांचे आभार

महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन अंधळे यांनी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वीच सावे यांच्याकडे आंधळे यांनी महाज्योती संस्थेअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंबंधी सावे यांच्याकडे काही मागण्या केल्या होत्या.

दरम्यान, या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सावे यांनी दिल्याचे आंधळे यांनी म्हटले आहे. त्याबद्दल आंधळे यांनी महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीकडून अतुल सावे यांचे आभार मानले आहेत.

काय होत्या महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या मागण्या ?

सारथी व बार्टी या संस्था PhD अधिछात्रवृत्ति योजनेकरिता सरसकट विद्यार्थ्यांची निवड करीत असताना महाज्योती संस्थेने २०२२ मध्ये जी जाहिरात काढली आहे त्यामध्ये फक्त २०० लोकांना अधिछात्रवृत्ति देण्याचे मान्य केले आहे. तरी महाज्योती संस्थेनेही सरसकट विद्यार्थ्यांची निवड करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना छात्रवृत्तिचा लाभ द्यावा.

महाज्योती संस्थेने M.Phil व PhD इंटिग्रेटेड करून सदर अधिछात्रवृत्ति योजनेचा लाभ संशोधक विद्यार्थ्यांना द्यावा. महाज्योती संस्थेद्वारा UGC च्या नियमानुसार सारथी व बार्टी संस्थेप्रमाणे PhD विद्यापीठाकडे नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ति (Fellowship) देण्यात यावी.

महाज्योती संस्थेमार्फत MPSC ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग ) व UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) च्या विविध पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी ५०००० रुपये मदत देण्यात यावी.

महाज्योती संस्थेमार्फत MPSC ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग ) व UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) च्या विविध मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी ५०००० रुपये मदत देण्यात यावी.

महाज्योती संस्थेत १००० कोटीचा निधी देण्यात यावा व संचालक मंडळात तज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात यावी. महाज्योतीच्या विविध योजनांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे. तसेच अपंग व अनाथांना ही आरक्षण देण्याची मागणी केली.

महाज्योतीच्या संचालक मंडळात OBC, VJ NT, SBC या तिन्ही प्रवर्गातील संचालकांचा समावेश करण्यात यावा, तसेच एका महिला संचालकांची नेमणूक करण्यात यावी.

मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण करण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा.

ओबीसींची ७२ वसतीगृहे स्थापन करण्याबाबत मागील सरकारने घोषणा केली होती. या सरकारने विद्यार्थी हिताचा विचार करत ओबीसींची ७२ वसतिगृह स्थापन करण्याबाबत लवकर कारवाई करावी.

वसतिगृहाचा प्रश्न संपेपर्यंत राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या नावे स्वाधार योजना सुरू करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा.

तसेच महाज्योती संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घ्यावा.

नवीन संचालक मंडळा मध्ये OBC, VJ NT, SBC या तिन्ही प्रवर्गांना संधी देण्यात यावी व महिला प्रतिनिधी म्हणून देखील एका महिला संचालकाची नेमणूक करावी.

नवीन संचालक मंडळा मध्ये OBC, VJ NT, SBC या तिन्ही प्रवर्गांना संधी देण्यात यावी व महिला प्रतिनिधी म्हणून देखील एका महिला संचालकाची नेमणूक करावी.

महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या मागण्यांवर अतुल सावे सकारात्मक

महाज्योती संस्थेने PhD च्या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी फक्त 200 विद्यार्थ्यांची जाहिरात काढली होती. सारथी व बार्टी या संस्थांच्या तुलनेत महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशीपच्या संख्येमध्ये वाढ करणार असल्याचे सावे यांनी सांगितले आहे.

महाज्योती संस्थेअंतर्गत येणाऱ्या UPSC व MPSC च्या विद्यार्थ्यांच्या मासिक विद्यावेतन मध्ये वाढ होणार आहे व त्यांना आकस्मिक निधीही सारथी – बार्टी या संस्थेप्रमाणे देण्यात येणार आहे.

महाज्योती संस्थेमार्फत सर्व संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फेलोशिप ही सारथी व बार्टी या संस्थांच्या धर्तीवरच JRF-SRF प्रमाणे देण्यात येणार असल्याचेही सावे म्हणाले.

UPSC व MPSC च्या विविध मुख्य परीक्षांसाठी व मुलाखतींसाठी सारथी व बार्टी या संस्था आर्थिक मदत देतात. याच धरतीवर महाज्योती देखील UPSC व MPSC च्या विविध मुख्य परीक्षांसाठी मुलाखतींसाठी आर्थिक मदत देणार आहे.

परदेशी स्कॉलरशिप, स्वाधार योजना, ओबीसींची 72 होस्टेल यासंदर्भात देखील सरकार सकारात्मक असल्याचे सावे यांनी सांगितले.

अतिरिक्त जागा निर्माण करून एमपीएससी यूपीएससीच्या जुन्या विद्यार्थ्यांना सामील करून घेण्याबाबत ही अतुल सावे सकारात्मक आहेत. पुणे येथील महाज्योती मार्फत देण्यात येणारे यूपीएससी व एमपीएससी चे प्रशिक्षण ही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती आंधळे यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments