|

महाजनांचा अंहकार नडला

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

सांगली-जळगाव मध्ये भाजपचा कार्यक्रम एकदम करेक्ट झाला

मुंबई : नुकतेच झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत बहुमत असतांना सुद्धा शिवसेनेचा महापौर निवडून आला. सामानातून याबाबत टिका करण्यात आली आहे. महाजन यांनी जळगाव महापालिकेत सत्ता आणली. महाजन यांचा कारभार एकतंत्री आणि अहंकारी होता. त्यामुळे भाजप नगरसेवक कंटाळले होते. महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाची की आपल्यात क्षमता आहे, पक्षाने जबबदारी दिली तर बारामतीत विजय मिळवून देतो, अशी भाषा ते करू लागले अशी टिका सामनातून भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आली.

महाराष्ट्रात भाजपची पाच वर्ष सत्ता होती. त्या सत्तेतून पैसे व पैशातून सर्व स्तरावरील सत्ता विकत घेण्यात आली. पैसे फेकले सर्व मिळते हा सिद्धांत भाजपने रुजवला. पण महाराष्ट्रात १०५ आमदार निवडून आले असताना भाजपला सत्ता मिळाली नाही. सत्ता गेली की अक्कल जाते. अक्कल गेले की भांडवल जाते, भांडवल गेले कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव भाजपला आला असे अशी टिका अग्रलेखात केली आहे.

सांगली-जळगाव मध्ये भाजपचा कार्यक्रम एकदम करेक्ट झाला. राज्यात इतर ठिकाणी सुद्धा असा करेक्ट कार्यक्रम होईल. शेवटी सत्ता हेच हत्यार असते व सत्ता हीच, संकटमोचक, कवचकुंडले ठरतात. बाकी सारे अहंकार, गर्व व्यर्थ ठरतात  असाही टोला यात लागविण्यात आला.

महाराष्ट्रात मधल्या काळात भाजपला जरा सूज आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ असा गैसमज काही मंडळीने करून घेतला होता. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यामध्ये शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगाव मध्ये झाला अशी टिका सामना मधून भाजपवर करण्यात आली.   


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *