Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचालॉकडाऊनची घोषणा आजच होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

लॉकडाऊनची घोषणा आजच होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

मुंबई: लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबत माहिती दिली असून महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषण होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय आजच घेतील असेही शेख यांनी सांगितले.
अस्लम शेख मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लॉकडाऊन बाबत नियमावली तयार होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या आठवड्या पासून मुख्यमंत्री बैठका घेवुन विरोधीपक्षासह सर्वांना विश्वासात घेत आहे. टास्क फ़ोर्सशी चर्चा झाली. लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. याबाबत लोकांशी बोलणे सुद्धा चालू आहे. ब्रेक द चैन नुसार हा निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. राज्यात ५० टक्यापेक्षा जास्त टेस्ट केल्या आहेत. त्यामुळे केस जास्त आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होईल. परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी अडवत नसल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.
याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊन मध्ये जिल्हाबंदी असेल असेही सांगीतले. लॉकडाऊन निर्णय झाल्यावर दोन दिवसांनी तो लागू होईल. लोकांना तयारी करण्यासाठी वेळ दिला जाईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्याच्या बैठकीत सुद्धा लॉकडाऊन लावावा लागणार असे संकेत दिले होते. १५ ते ३० एप्रिल असा लॉकडाऊनचा कालावधी असणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments