राज्यात लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. काही जिल्हयात तर लॉकडाऊन सुद्धा करण्यात आला आहे.  यामुळे वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. कोरोना बाबत नव्याने आदेश काढण्यात आले असून अनेक निर्बंध लावण्यात आले आहे.

काल एका दिवसात राज्यात २५ हजार नवीन रुग्ण आढळले आहे. वाढती संख्या पाहता सरकारने यापूर्वीच हॉटेल, मंगलकार्यालय यावर बंधने आणली होती. आज सरकारने नव्याने नियमावली आणून खासगी कार्यालयावर निर्बंध आणले आहे. राज्यातील सर्व खासगी कार्यालय, अस्थापना (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा यांना वगळून ) ५० टक्के उपस्थिती ठेव्याबाबत नियमावली काढली आहे.

सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालायचा विभाग व कार्यालय प्रमुख यांनी कोरोना परिस्थिती घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी संख्या किती ठेवायची ते निश्चित करावे असे सुद्धा आदेशात म्हटले आहे.

तसेच नाट्यगृह, सभागृह यातील उपस्थिती ५० टक्के करावी आणि त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक , सांस्कृतिक मेळावे व सभा घेण्यासाठी करता येणार नसल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *