|

लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Lockdown has increased, tell the common man how to live; BJP leader questions CM
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. याबाबत विरोधी पक्षाकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून लॉकडाऊन मध्ये जाहीर केलेले पॅकेजचे काय झाले अस विचारत कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा असा प्रश्न. उपस्थित केला आहे.
याबाबत केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी सांगा गरिबांनी जगायचं कस? १४ एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा.
५ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये तर १२ लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा.
अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही.
संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज १५ दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाहिये. असा त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *