फडणवीस-आव्हाडांमध्ये पॅकेज वरून शाब्दिक वाॅर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोरोना बाबत माहिती दिली. तसेच नियम पळणार नसेल तर पुढील दोन दिवसात लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युरोप मधील अनेक देशाचे उदाहरण देत लॉकडाउन मध्ये तेथील सरकारने किती मदत केली याची माहिती देत राज्य सरकार नागरिकांना काही न देता लॉकडाउन करत असल्याचा टोला लगावला होता. यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चांगली जुंपली आहे. फडणवीस आणि आव्हाड यांच्यात पॅकेज वरून चांगलाच शाब्दिक वार सुरु झाले आहे.
फडणवीस यांनी युरोप मधील अनेक देशाचे उदाहरण देत लॉकडाउन मध्ये तेथील सरकारने किती मदत केली याची माहिती देत राज्य सरकार नागरिकांना काही न देता लॉकडाउन करत असल्याचा टोला लगावला होता.
यानंतर गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून “पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे ….आपले केंद्र सरकार काय देणार …अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही … बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून” असा टोला लगावला होता.
यानंतर देवेंद्र फडणवीस हे माध्यमाशी बोलतांना म्हणाले की, केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. मात्र राज्य सरकारने एकही पैसा नागरिकांच्या मदतीसाठी दिला नसल्याचा आरोप केला.
गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत परत एकदा ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी २० लाख कोटी हे मी शब्दात लिहू शकतो. पण आकड्यात किती शून्य येतात हे माझी स्मरणशक्ती कामकुवत असल्याकारणाने काही जमत नाही. आपली स्मरणशक्ती मजबूत असल्याकारणाने ह्या शून्यांमधील किती शून्य महाराष्ट्राच्या वाट्याला आले. हे जर सांगितल तर ते मी नक्कीच पाठांतर करून माझ्या स्मरणात ठेवीन. फक्त एवढंच तुम्हांला आठवणीने सांगतो. कि केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळामध्ये दिलेली वैद्यकीय सामुग्री पीपीई किट, व्हेंटिलेटर इ. वैद्यकीय सामान देखील काही दिवसानंतर देण्याच बंद केल होतं. एवढं माझ्या स्मरणात आहेअशी बोचरी टिका आव्हाड यांनी केली आहे.