…बंदी उठवा; अदर पूनावाल यांची जो बायडेन यांच्याकडे हात जोडून विनंती

पुणे: कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. याला आळा घालायचा असेल तर लसीकरण गरजेचे आहे अस मत वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत. दरम्यान लसींच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने कच्चा मालाचा पुरवठा थांबविल्याचेही त्यांनी सांगितले होते. अद्यापही कच्चा मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पूनावाला यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे हात जोडून विनंती केली आहे.
“अमेरिका आणि युरोपमधून कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, काही दिवसापूर्वी तो पुरवठा थांबविल्याने सिरम इन्स्टिट्यूटला अडचण निर्माण झाली आहे. असा अदर पूनावाला यांनी आता जो बायडेन यांना ट्वीट विनंती केली आहे.
काय म्हणाले अदर पूनावाला
“आदरणीय जो बायडेन…जर आपण खरच कोरोना विषाणू विरोधात एकत्र आहोत तर अमेरिकाबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणास नम्र विनंती करतो कि, अमेरिका बाहेर होणाऱ्या कच्चा मालाची निर्यात बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे असेही त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे.
यापूर्वी सुद्धा अदर पूनावाला यांनी कच्चा माला बाबत आवाज उठविला आहे. मला शक्य असत तर मी अमेरिकेत गेलो असतो आणि स्वतः अमेरिकेत या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केले असता असे एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.