|

आयपीएलचे प्रणेते ते सुष्मिताचे ‘बेटर हाफ’; ललित मोदी आहेत तरी कोण?

ललित मोदी
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

आपल्या वादग्रस्त कारकीर्दीमुळे प्रसिद्ध असलेले उद्योजक ललित मोदी (Lalit Modi) हे नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. बाॅलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनशी (Sushmita Sen) डेटींग करत असल्याचा खुलासा खुद्द ललित मोदीने केलाय.

ललित मोदी हे देशातील आघाडीच्या व्यावसायिक घराण्यातील असून व्यापारी जगतात त्यांचं मोठं नाव आहे. तर दुसरीकडे सुष्मिता सेनने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं आहे. ती करोडो रुपयांच्या मालमत्तेची मालकीन आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा होती.

ललित मोदी आणि सुष्मिता सेन या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. मात्र, ललित मोदींनी लग्नाच्या चर्चाला पुर्णविराम देत आम्ही फक्त डेटिंग करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता ललित मोदी नाव पुन्हा बातम्यांमध्ये झळकू लागलंय.

ललिल मोदी आहे तरी कोण?

ललित मोदींना आज भलेही पळपुट्यासारखं आयुष्य जगावं लागतंय. पण एक काळ असा होता, ज्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये ललित मोदीचा बोलबाला होता. ललित मोदींनी खेळाला व्यावसायिक उंचीवर पोहचवण्याचं काम केलं. सध्या जगप्रसिद्ध असलेल्या आयपीएलचे प्रणेते देखील ललित मोदी होती.

बीसीसीआयचे मध्ये एकेकाळी मोठ्यापदावर असणारे ललित मोदी यांनी IPLची म्हणजेच इंडिअन प्रीमियर लीगची देखील स्थापना केली. एवढंच नाही तर आयपीएलला जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून याच काळात लौकिक मिळवून दिला. ललित मोदी बीसीसीआयमध्ये असताना त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली.

दिल्लीतील एका प्रभावशाली व्यापारी वर्गातील कुटुंबात जन्मलेले ललित कुमार मोदी कधीच हुशार विद्यार्थी नव्हते, मात्र, ते नक्कीच हुशार व्यापारी होते. ललित यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1963 रोजी कृष्ण कुमार मोदी यांच्या घरी झाला.

काॅलेजमध्ये राडा-

1985 मध्ये त्यांना ड्यूक विद्यापीठात ड्रग्ज विकल्याबद्दल अटक करण्यात आली. त्यावेळी पहिल्यांदा ललित मोदींनचा वादाशी संबंध आला. नंतर त्याला प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी ताब्यातही घेण्यात आलं. त्याच वर्षी ललित मोदी आणि आणखी एका विद्यार्थ्यावर अपहरणाचा आरोप होता.

ललित मोदींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्यात आली. पुढच्या वर्षी ड्यूक विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर मोदीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आणि आरोग्याच्या कारणास्तव भारतात प्रवास करण्याची परवानगी मागितली.

न्यायालयाने मोदींना 1990 पर्यंत 200 तास सामुदायिक सेवा करण्याचे आदेश दिले आणि नंतर त्याला घरी परतण्याची परवानगी दिली. अमेरिकेवरून आल्यावर वडिलांच्या व्यवसायात लक्ष देण्यास सुरवात केली.

ललितला वडिलांच्या कंपनीतील एकही प्रोजेक्ट आवडला नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:चा मार्ग निवडला. 1992 पर्यंत, मोदी भारतातील सर्वात मोठ्या तंबाखू कंपन्यांपैकी एक असलेल्या गॉडफ्रे फिलिप्स इंडियाचे कार्यकारी संचालक होते, परंतु क्रिकेट आणि मनोरंजन यात मोदीला विशेष सर होता.

आईच्या मैत्रिणीशी लग्न-

1991 च्या सुमारात ललित मोदी यांनी आईची मैत्रिण असलेल्या मीनलसोबत लग्न केलं. अमेरिकेत शिकत असताना ललित मोदी आणि मीनलची भेट झाली होती. ललित मोदींनी मीनलसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं तेव्हा मीनलला राग आला.

मीनलने नायजेरियन उद्योगपती जॅक सागरानीशी लग्न केलं. त्यानंतर दोघांचं बोलणं बंद झालं होतं. मीनल आमि जॅक सागरानी यांचं नातं जास्त दिवस चाललं नाही. त्यानंतर ललित आणि मीनल पुन्हा जवळ आले.

मीनल ललित मोदींपेक्षा वयाने 9 वर्षांनी मोठी होती. तरीदेखील दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांच्या परिवाराला हे लग्न मान्य नव्हतं. ललित मोदी आणि मीनल मोदी यांचा विवाह 17 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. मोदींनी त्यांची आजी दयावती मोदी यांनी कुटुंबाला लग्नासाठी राजी केलं.

ललित मोदी आणि मीनल मोदी यांनाही दोन मुले आहेत. मुलगाचं नाव रुचिर मोदी आणि मुलगी आलिया मोदी. ही दोन्ही मुलं सध्या इंग्लंडमध्ये आहेत.

क्रिकेट आणि ललित मोदी-

ललित मोदी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनमध्ये 1999 मध्ये सामील झाले. त्यावेळी त्यांनी एक क्रिकेट स्टेडियम बांधण्याचे वचन दिलं. जे भारतीय संघ उन्हाळ्यात क्रिकेट खेळण्यासाठी वापरू शकेल. दिलेला शब्द पाळण्यासाठी ललित मोदींनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

हिमाचल प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री धुमल यांनी स्वत:च्या मुलाला राज्य क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बसवलं. 1996 साली ललित मोदी यांनी बीसीसीआयला मर्यादित षटकांच्या मालिकेची ऑफर दिली होती. मात्र, त्यावेळी अध्यक्ष असलेल्या जगनमोहन डालमिया यांनी ही ऑफिर धुडकावून लावली.

2005 साली बीसीसीआयमध्ये निवडणूक झाली. त्यावेळी शरद पवार आणि जगनमोहन डालमिया यांच्या थेट लढत होती. त्यावेळी ललित मोदी यांनी शरद पवारांचं समर्थन केलं आणि पारडं पवारांच्या बाजूने झुकवलं. त्याचा प्रसाद ललित मोदींना मिळाला.

ललित मोदी बीसीसीआयचे उपाध्यक्ष झाले. ललित मोदी बीसीसीआयमध्ये सर्वात कमी वय असलेले उपाध्यक्ष बनले. 2008 साली भारताने नुकताच सुरू झालेला टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला. आयपीएल सुरू करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मोदींनी बीसीसीआयला पटवून दिलं.

ललित मोदींनी बॉलीवूड, क्रिकेट आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय बिझनेसमन मित्रांच्या मदतीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची सुरूवात केली. भारतीयांना आयपीएलची संक्लपना खूप आवडली. क्रिकेटप्रेमींनी आयपीएलला डोक्यावर घेतलं.

ललित मोदी आणि वाद-

बीसीसीआयने आयपीएलच्या माध्यमातून करोडो रूपये कमावले. पहिल्या दोन सीजननंतर ललित मोदी यांचा जलवा सर्वत्र दिसू लागला. मात्र, येत्या काही दिवसातच ललित मोदी आणि बीसीसीआयमधील संबंध ताणले गेले. त्याला कारण होतं भ्रष्टाचार…

आयपीएल लीग मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर सट्टेबाजीचे आश्रयस्थान बनल्याचा आरोप विरोधकांनी केला. विरोधकांनी ललित मोदी आणि शरद पवार यांच्या पुतळ्याचं दहन केलं. ललित मोदींवर आयपीएल बोलीमध्ये कमिशन खाल्ल्याचा आरोप होता.

आयपीएलच्या दोन संघांमध्ये हिस्सेदारी असल्याचा आरोप ललित मोदींवर करण्यात आला होता. सोनी टीव्हीला आयपीएल प्रसारण हक्क विकण्यासाठी पैसे घेतल्याचे गंभीर आरोपही झाले होते. अटकेची टांगती तलवार पाहून त्यांनी भारत सोडून ब्रिटनमध्ये आश्रय घेतला.

2013 मध्ये ललित मोदींवर बीसीसीआयने नेहमीची बंदी घातली. आयटी विभागाच्या म्हणण्यानुसार, मोदींवर आयपीएल 2 च्या सामन्यांमध्ये सट्टेबाजी केल्याचाही आरोप आहे. इतर सर्व आरोपांनंतर, ईडीने तपास सुरू केला होता. परंतु, मोदी यूकेला पळून गेल्यानंतर त्यांना फरार घोषित करण्यात आलं.

हे ही वाचा की-


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *