Tuesday, October 4, 2022
HomeUncategorizedसरकारविरोधी संघर्षात सातत्याचा अभाव, प्रियंका ११ महिन्यांनी रस्त्यावर अवतरल्या!

सरकारविरोधी संघर्षात सातत्याचा अभाव, प्रियंका ११ महिन्यांनी रस्त्यावर अवतरल्या!

काल कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनाची चर्चा देशभर सुरु आहे. काळी कपडे परिधान करत संसदेपासून राष्ट्रपती भवनपर्यंत कॉंग्रेसकडून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी तमाम कॉंग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे राहुल व प्रियंका गांधींना आंदोलन गुंडाळावे लागले. त्यानंतर राहुल यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राहुल-प्रियंकांची लक्षवेधी आक्रमकता

या आंदोलनात राहुल व प्रियंका गांधी यांचे आक्रमक तेवर पाहायला मिळाले. महागाईवरून कॉंग्रेसकडून नेहमीच सरकारवर टीका केली जाते. संसदेत आणि संसदेच्या बाहेर कॉंग्रेस महागाईच्या मुद्द्यांवर बोट ठेवत केंद्र सरकारला घेरत असतात.

मात्र, कालच्या आंदोलनात राहुल व प्रियंका गांधी जास्तच आक्रमक दिसले. दोघांनीही रस्त्यावर उतरून आंदोलनाला बळ दिले. त्यांच्यामुळे आंदोलनात धग निर्माण झाली, त्यामुळे कॉंग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील देशात ठिकठिकाणी सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

आंदोलन करत असताना राहुल व प्रियंका गांधी यांची पोलीसांशी झटापट झाली. तरीही पोलिसांना न जुमानता राहुल व प्रियंका रस्त्यावर ठाण मांडून बसू पाहत होते. एकंदरीतच दोन्ही बहिण-भावांच्या आक्रमकता लक्षवेधी ठरली.

सातत्याचा अभाव

पण या आक्रमकतेला सोयीची किनार आहे. सरकारविरोधात लढण्यासाठी लागणाऱ्या सातत्याचा अभाव प्रियंका गांधी यांच्यामध्ये दिसतो. कारण त्यांना रस्त्यावर उतरून जनसामान्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला सवाल करण्यासाठी तब्बल ११ महिने लागले!

युपीतील लखीमपुर येथे आंदोलनकारी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्यानंतर प्रियंका गांधी रस्त्यावर उतरल्यामुळे हे प्रकरण जास्तच चिघळले होते. चार शेतकऱ्यांचा बळी गेल्याने प्रियंका गांधींनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला होता.

हाथरस बलात्कार प्रकरणानंतर पहिल्यांदाच त्या इतक्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर थेट कालच प्रियंका रत्यावर अवतरल्याचे दिसून आले.

प्रश्न एवढाच आहे की, ऑक्टोबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या काळात सरकारविरोधात लढण्यासाठी प्रियंका गांधींना कुठलेच मुद्दे मिळाले नाहीत की रत्यावर उतरण्यासाठी मुहूर्त मिळाला नाही ??

हाथरस असो की लखीमपुर दोन्ही घटनांना उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती.. लखीमपुर येथील मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संपूर्ण आंदोलनकारी शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न झाला.

तर हाथरस येथील पिडीत मुलीमध्ये तिच्या दलित असण्याच्या मुद्द्यावरून प्रियंका व राहुल गांधींनी बलात्कार प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला. तरीही युपी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला.

युपी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रियंका गांधींनी सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी सातत्याने सरकारविरोधात संघर्ष केल्याचे का दिसून आले नाही.?

लखीमपुर प्रकरणानंतर तब्बल ११ महिन्यांनी त्यांच्यात व पोलिसांमध्ये झटापट झाली. मधल्या काळात निवडणुकीत प्रचार सभा वगळता सामान्य माणसांच्या प्रश्नावर त्या बोलल्या नाहीत, असे नाही. पण सरकारविरोधात संघर्ष करत असताना त्यांची आक्रमकता दाखलपात्र ठरण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालवधी का लागला ??

अधिक वाचा :

मोदी विरुद्ध मोदी ; प्रल्हाद मोदींनी याअगोदरही बंधूंवर टीका केलेली आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments