Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचाकुंभमेळा विसर्जित! पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद

कुंभमेळा विसर्जित! पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद

नवी दिल्ली: देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. अशात हरिद्वार येथील महाकुंभमेळ्याला लाखोच्या संख्येनं साधू-संत आणि भाविक उपस्थित राहिले. शाही स्नानासाठीदेखील एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यानंतर अनेक संतांसह भाविकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर कुंभ समाप्तीच्या घोषणेची बातमीही समोर येऊ लागली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत साधुसमाजाने कुंभमेळा विसर्जित करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्यासोबत आज फोनवर बोलणं झालं असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
पंतप्रधानांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत पंचदशनाम जुना आखाड्यातील महामंडलेश्वर, आचार्य, सभापती, स्थानापती व साधु यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. कोरोनाच्या संकटाची या बैठकित चर्चा होवून कुंभमेळा विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदन अध्यक्ष महंत प्रेमगिरी महाराज, आखाड्याचे मंत्री महंत मोहन भारती, महंत महेश पुरी, जुना पिठाधिश्वर आचार्य अवधेशानंद गिरी यांनी प्रसिद्ध केले आहे.

काय होतं पंतप्रधानांचं ट्वीट?
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्यासोबत आज फोनवर बोलणं झालं. सर्व संतांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला प्रत्येक प्रकारचं सहकार्य करत आहेत. यासाठी मी संतांचे आभार व्यक्त केले. मी विनंती केली, की दोन शाही स्नान झाले आहेत आणि इथून पुढे कोरोनाचं संकट पाहाता कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं. यामुळे या संकटाविरोधातील लढाईला एक ताकद मिळेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments