|

कोलकाता महापालिकेवर ‘तृणमूल’चा झेंडा, ममता दीदींनी उडवला भाजपचा धुव्वा

mamta
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

कोलकता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिले आहे. कोलकता महापालिका निवडणुकीत टीएमसीने 144 जागांपैकी 134 जागा मिळवल्या आहेत.

महापालिका निवडणुकीत टीएमसीने भाजपचा सुफडा साफ करत हा मोठा विजय मिळवला आहे. कोलकता महापालिकेसाठी 144 जागांची आज मोजणी झाली. ज्यात टीएमसीच्या खात्यात 134 जागा गेल्या तर, भाजपच्या खात्यात फक्त 3 जागा गेल्या आहेत. कॉंग्रेस, डावांच्या खात्यात प्रत्येकी दोन जागा गेल्या आहेत.

तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला 71.95% एवढी मते मिळाली. यात भाजपला केवळ 08.94% एवढी मते मिळाली. कॉंग्रेसला 04.47 आणि डाव्यांना 11% मते मिळाली आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी निवडणुकीमध्ये विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे देखील आभार मानले आहेत. कोलकतिल जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मी कोलकात्याच्या जनतेचा आभारी आहे. असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

कोलकाता महापालिकेच्या या निकालावर टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीदेखील ट्वीट करून आनंद व्यक्त केला आहे. बंगालच्या राजकारणात द्वेष आणि हिंसेला जागा नसल्याचे कोलकात्याच्या जनतेने दाखवून दिले आहे.

येथील जनतेने आम्हाला इतका मोठा कौल दिला, आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल कोलकात्याच्या जनतेचा मी आभारी आहे. असे आनंद त्यांनी ट्वीट करत व्यक्त केला आहे.

19 डिसेंबरला कोलकता महापालिकेसाठी मतदान झालं होत. या निकालाच्या मतमोजणीसाठी 16 मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. कोणताही हिंसाचार घडू नये यासाठी 200 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

2 वर्षात ओबीसींचा डेटा का गोळा केला नाही, तेव्हा झोपला होतात का? फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

जया बच्चन यांनी सांगितलं मोदी सरकारला शाप देण्यामागचं खरं कारण

भाजपच्या ‘या’ नेत्यांनी देवस्थानांच्या जमिनी लाटून केला हजारो कोटींचा घोटाळा, मलिकांचा धक्कादायक आरोप

IPL 2022 साठी ‘या’ महिन्यात होऊ शकतो ‘मेगा ऑक्शन’


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *