केतकरांचं सोनिया गांधींवर प्रेम होतं, त्यांची भूमिका मांडत राहिले आणि शेवटी राज्यसभेवर गेले – राऊत

पुणे : कुठल्याही सरकारला आपल्या मर्जीतील वृत्तपत्र नसेल तर ते नको आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाकाळात मृतदेहांचे फोटो एका वृत्तपत्राने दाखवले. तेव्हा त्याच्यावर आठ दिवसांत धाडी टाकण्यात आल्या.
मग त्यावेळी त्यांच्या पाठीशी कोण उभं राहिलं? देशातील मीडिया उद्योजकांच्या हाती जातेय. मात्र, वृत्तपत्रांशिवाय सरकार आणि सरकारशिवाय वृत्तपत्र शक्य नाही. आजची पिढी लिहायला, कागदाला पेन लावायला विसरली आहे.
हेच मोठं आव्हान असणार आहे, अशी खंत व्यक्त करतानाच मीडियाला माझ्यामुळे काम मिळतंय. समाजात आणि देशात क्रांती घडवून आणण्याची ताकद वृत्तपत्रात असल्याचा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केलाय.
आज पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने या विषयावर राऊत यांनी आपली भूमिका मांडली.
राऊत म्हणाले की, भाषिक वृत्तपत्र देशाचा राज्याचा आधार आहेत. राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं, अस वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाच होतं.
मी संपादक झालो तेव्हापर्यत कधीच अग्रलेख कधीच लिहला नव्हता. सामान्य माणसाची व्यथा मांडतो म्हणजे राजकारणच आहे.
पत्रकारांना भूमिका असायलाच पाहिजे. तो कुठल्या तरी पक्षाचा असायला हरकत नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेला पुढे घेऊन जायला पाहिजे. आमच्या कुमार केतकर यांचं सोनिया गांधींवर प्रेम होतं.
त्याच्याविषयी त्यांना अजिबात खंत नव्हती. ते त्यांची भूमिका मांडत राहिले आणि शेवटी राज्यसभेवर गेले. असं म्हणत पत्रकार अधिक प्रकारे चांगली भूमिका मांडू शकतो, जर त्याच्याकडे वृत्तपत्र असेल,’ असंही राऊत म्हणाले.
कुमार केतकर हे बाहेर भूमिका मांडूनच राज्यसभेत गेले.पण ते तिकडे गेल्यावर सोनिया गांधी यांची भूमिका मांडताना ते दिसत नाहीत. त्यामुळे भूमिका मांडत राहील पाहिजे, जी आम्ही मांडतो, असा सल्लाही राऊतांनी केतकरांना दिलाय.