Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचा‘त्या’ व्हिडिओ मुळे कर्नाटकचे जलसंपदामंत्री अडचणीत

‘त्या’ व्हिडिओ मुळे कर्नाटकचे जलसंपदामंत्री अडचणीत

बेंगलुरू:  बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा एका तरुणीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी या व्हिडीओची सीडी समोर आणली आहे.

रमेश जारकीहोळी यांनी कर्नाटक पॉवर ट्रान्स्मिशन कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय तरुणीला शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष असलेले दिनेश कलहळ्ळी हे प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले.

आमिष दाखवून नंतर नोकरी देण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओ बद्दल माहिती होताच रमेश जारकीहोळी यांनी तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. हे खूप संवेदनशील प्रकरण असून गेल्या आठवड्यात पीडित तरुणीच्या कुटुंबाने माझ्याकडे मदत मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोणतेही निष्कर्ष काढण्यापूर्वी या व्हिडिओची पडताळणी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. जर ते सत्य असले तर ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. भाजप नेहमी नैतिकतेला अनुसरून कार्यरत असल्याचे ते म्हणाले.

रमेश जारकीहोळी कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री आहेत. त्यांचावरील आरोप फेटाळत हा व्हिडिओ फेक असल्याचं त्यांनी म्हटले आहे. आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन असेही ते म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा व इतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हा व्हिडिओ महिन्याभरा पूर्वीचा असून दिनेश कलहळ्ळी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments