Tuesday, October 4, 2022
HomeZP ते मंत्रालयकपिल सिब्बल यांचा युक्तिवाद प्रभावी ; पण त्यांचा केसेस हारण्याचा मोठा रेकॉड...

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद प्रभावी ; पण त्यांचा केसेस हारण्याचा मोठा रेकॉड आहे…

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या पाच सुन्यावन्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावनीवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळेच संपूर्ण देशाचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.

शिवसेनेकडून कोर्टात बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यामुळे सिब्ब्बल यांचा युक्तिवाद शिवसेनेला तारणारा का ? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

ठाकरे सरकारकडून बऱ्याच केसेस कपिल सिब्बल यांनी लढल्या होत्या. मात्र, कपिल सिब्बल सक्षमपणे बाजू मांडू न शकल्याने महाराष्ट्र सरकारला वारंवार फटकार खावी लागली होती.

पण सिब्बल यांनी आज शिवसेनेची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली असून, यावेळी तरी ते आपल्या पक्षाला न्याय देऊ शकतील का ? असा सवाल आहे.

बाबरी मशीद प्रकरण

रामजन्मभूमीच्या बाजूने हरीश साळवे तर सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. पण न्यायालयाचा निकाल रामजन्मभूमीच्या बाजूने आला.

शिया वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. कपिल सिब्बल यांनी ज्या पक्षाची भूमिका मांडली, त्याविरोधात कोर्टाने निकाल दिल्याने सिबब्ल ही केस पराभूत झाले.

कर्नाटकातील हिजाब प्रकरण

कर्नाटकातील हिजाब प्रकरण देशभर चर्चेत होते. त्यावर सिब्बल यांनी शाळांमध्ये हिजाबप्रकरणात लक्ष घातले होते. पण सीजेआयने त्यावर सुनावणी करण्यास नकार दिला होता.

मुस्लीम विद्यार्थ्याचे वकील म्हणून सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. पण हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात आहे, त्यामुळे अगोदर तेथील सुनावणी पूर्ण करावी, असे सीजेआयने सांगितले होते.

तिहेरी तलाक

२०१९ मध्ये केंद्र सरकारने तिहेरी तलाक हे विरोयक मंजूर केले. मुस्लीम महिला विधेयक 2019 नुसार ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणून घटस्फोट देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षापर्यंत शिक्षा देण्याची यात तरतूद या विधेयकाच्या मध्यातून केली आहे.

या प्रकरणात देखील सिब्ब्बल यांनी उडी घेतली होती. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने तिहेरी तलाकवर सरकारविरोधात खटला लढवला होता.

तिहेरी तलाक श्रद्धेचा विषय असल्याने त्यावर बंदी घालणे योग्य होणार नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सिब्बल यांचा युक्तिवाद फेटाळून लावत तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

सीएए-एनआरसी प्रकरण

सीएए-एनआरसी प्रकरणी देशभर आंदोलने सुरु होती. सरकारने हे कायदे रद्द करावे, अशी मागणी जोर धरत होती. त्यावेळी सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात CAA विरोधात याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली होती.

या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत कायद्याला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी न्यायाधीशांनी फेटाळून लावली.

लालू यादव

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष, बिहारचे माजी मुख्यमंत्री प्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे आरोप झाले. पण कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करूनही त्यांना जेलमध्ये जावे लागले. मात्र, कपिल सिब्बल यांच्याच प्रयत्नामुळे लालूंना जमीन मिळाल्याचे बोलले जाते.

मराठा आरक्षण

राज्यातील मराठा समाजाला दिलेले आलेले आरक्षण न्यायालयाने अवैध ठरविले. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक असल्याचे सांगितले व त्यास अवैध ठरवले.

त्यानंतर आरक्षण वैध ठरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने न्यालयीन लढाईचा भाग म्हणून खटला लढवण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची टीम तयार केली. ज्यात कपिल सिब्बल यांचा समावेश होता. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद केला. पण त्यांना मराठा आरक्षण वैध ठरविण्यात यश आले नाही.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारने न्यायालयीन लढाई लढली. यासाठी कपिल सिब्बल यांचा सल्ला घेण्यात आला होता. मात्र, ही न्यायालीन लढाई ठाकरे सरकार जिंकू शकले नाही.

कपिल सिब्बल हे देशातील सर्वात नावाजलेले व महागडे वकील आहेत. त्यांनी आजवर अत्यंत ‘हाय प्रोफाईल’ केसेस लढल्या आहेत. एवढेच काय तर नॅशनल हेराल्ड प्रकरणी देखील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली होती.

मात्र, त्यांना ही केस जिंकण्यात यश आले नव्हते. तसेच काही केसेसमधून त्यांनी माघारही घेतलेली आहे. आज जरी त्यांनी शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडली असली ; तरीही त्यांच्या पराभवाचा इतिहास शिवसेनेची धडकी भरवणाराच आहे.

अधिक वाचा :

National Herald case: ‘नॅशनल हेराल्ड प्रकरण’ आहे तरी काय?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments