कंगनानं उडवली महाराष्ट्राची खिल्ली

kangana-made-fun-of-maharashtra
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: मुंबई महानगरपालिकेद्वारे कंगनाचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं होतं. तेव्हापासून ती सातत्यानं महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर ती प्रश्न उपस्थित करते. यावेळी तिनं लॉकडाउनचं निमित्त साधून उपरोधिक टीका केली आहे.
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळं या संक्रमणाच्या साखळीला तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं राज्यभरात लॉकडाउन जारी केला आहे. १४ एप्रिल ते १ मे या काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू असतील. या काळात काही उद्योगधंदे सुरु राहतील याची देखील काळजी सरकारनं घेतली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर आभिनेत्री कंगना रणौत हिनं ताशेरे ओढले आहेत. हे कसलं लॉकडाउन असं म्हणत तिनं सरकारची खिल्ली उडवली आहे.
तिनं एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरून बंद आहे. परंतु, तरी देखील सर्व बाजूंनी खुला आहे. या दरवाजाचा फोटो शेअर करत “महाराष्ट्रात लॉकडाऊन असा आहे” अशी उपरोधिक टीका तिनं केली आहे. तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

लॉकडाऊनमध्ये ‘या’ सेवा सुरु –
उत्पादन पूर्व आणि उत्पादनानंतरच्या पुरवठा इ. प्रक्रियेशी निगडित शेतीशी संबंधित सर्व कामे या काळात सुरू राहतील.
शासनमान्य माध्यमांशी संबंधित सर्व व्यवहार आणि कामांचा या सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रुग्णालय, लॅब, क्लिनिक, लसीकरण, मेडिकल इन्शुरन्सची कार्यालये, फार्मसी, औषध कंपन्या, यासाठी लागणाऱ्या सामानाचे डिलर, त्यांची वाहतूक, पुरवठा, लसींचं उत्पादन आणि पुरवठा, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांच्यासाठीचा कच्चा माल यांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा यात समावेश होतो. त्याशिवाय, प्राण्यांचे दवाखाने, अन्नपदार्थांची दुकाने इ.

किराणाची दुकानं, भाजीपाला, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी आणि इतर अन्नपदार्थांची दुकानं, शीतगृहे. विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बस वाहतूक या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी ई-कॉमर्सची सेवा.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *