जितेंद्र आव्हाडांनी केली मुख्यमंत्र्यांना विनंती म्हणाले…

Jitendra Awhad made a request to the Chief Minister ...
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने कठोर निर्बंधाची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे राज्यात जास्तीत जास्त प्रमाणत लसीकरण व्हाव यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रकारांसाठी विनंती केली आहे.

जितेंद्र आव्हाड यी ट्विट करून विनंती केली आहे. यात त्यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, “आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले. मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जावून आपल्याला माहिती देत असतात, समजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देने जरुरीचे आहे. त्यांची हि मागणी आपण ताबडतोब मान्य करावी हि विनंती.”

या पत्रकाराचे झाले निधन

एएनआय या वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर याचं मुंबईत निधन झाल. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुख्यमंत्र्यांचा फोन वरुण संवाद

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विट नंतर काही वेळाने या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाठींबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे सांगितले. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे. असे त्यांच्या नवीन ट्विट मध्ये सांगितले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *