जीन्स चालतील; पण टी-शर्ट नाही
मुंबई: जीन्स आणि टी-शर्टचा अर्थ काहींसाठी तणावमुक्त पोशाख असू शकतो, परंतु यापुढे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तो ‘वेष’ योग्य नाही. त्यामुळे आता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात जीन्स वापरण्याची मुभा दिली आहे. मात्र, टी-शर्ट वापरण्यास मुभा नसणार आहे. ह्या कारणाने तरुण अधिकार व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाची भावना निर्माण झाली आहे.
अनेक वेळा शासकीय कार्यालयामध्ये अनेक अधिकारी-कर्मचारी कामावर टी-शर्ट व जीन्स असा कॅज्युअल वेषात दिसत असल्याचे आढळून आले आहे. कर्मचाऱ्यांचे पेहरावाचे प्रतिबिंब कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीमत्वात व त्यांच्या कामावर उमटून येते. त्याच कारणाने मागील वर्षीचा डिसेंबरचा ड्रेसकोड आता लागू केला आहे.
कार्यालयात काम करताना जीन्स व टी-शर्ट वर बंदी घातल्याने कर्मचाऱ्यांची नाराजी होती. त्यामुळे ड्रेसकोड मध्ये बदल करण्याची मागणी पुढे येऊ लागली. त्यानुसार कार्यालयात टी-शर्ट चा वापर करू नये यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नव्याने पत्रक जाहीर केल्याचा आदेश जारी केला आहे.
तसेच, शुक्रवारी खादीचा ड्रेस परिधान करावा असेही आदेश दिले आहेत.