कोरोनाचे नियम पाळण्यात ‘आमचे चुकतंय’: या राज्यमंत्र्याची कबुली
पुणे: कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. अनेक मंत्री, राजकीय कार्यकर्ते मेळावे घेत आहेत. त्यात नियमाची पायमल्ली होत आहे. याबाबत राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रांजळ कबुली दिली आहे. कोरोनाचे नियम पाळण्यात ‘आमचे चुकतंय’ अशी कबुली दिली आहे.
दुर्दैवाने आम्ही सोशिअल डीस्टन्सिंगचे नियम पाळतोय, मास्क लावतोय हि खरी आमची चूक आहे हि आम्ही नाही केली पाहिजे, असेही ते म्हणाले. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. तर प्रशासन काही जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत राजकीय नेते मेळावे, कार्यक्रम घेतांना कुठलीही काळजी घेत नसल्याचे चित्र आहे. विश्वजित कदम यांनी नियम पाळण्यात येत नसल्याची कबुली दिली आहे.
सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे मात्र सर्वसामान्य नागरिकांना लस देण्याच्या प्रक्रियेला अजून बराच वेळ आहे. पुन्हा जरी कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी राज्य सरकार रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही कदम यांनी सांगितले.