विधानसभेच्या वेळी म्हणाले होते “धोतर फेडतो”; आज त्यांचा होणार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

 नगर: महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली. विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा हे नेते घरवापसी करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेले जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सीताराम गायकर हे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सीताराम गायकर हे अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवडून आले आहेत. सीताराम गायकर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत गायकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश हा पिचड यांना मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभेच्या वेळी धोतर फेडू असे बोलले होते अजित पवार
 २०१९ मध्ये निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या सीताराम गायकर यांची धोतर फेडण्याची भाषा केली होती. आता तेच गायकर राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनीच गायकर यांच्याविरोधातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घ्यायला सांगून गायकर यांना बिनविरोध निवडून दिले. सीताराम गायकर यांच्यासह अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे ९ सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

 कोण आहेत सिताराम गायकर?

  • सीताराम गायकर यांनी सुरुवातीच्या काळात ऊस तोड कामगार म्हणून काम केल.
  •  मेगरस येथे दूध संकलन केंद्राची सुरुवात केली.
  • अमृत सागर दुध संघाचे संचालक.
  • १९५५ मध्ये मधुकर पिचडांविरोधात बंड करत तिसऱ्या आघाडीची स्थापन केली. मात्र तिसरी आघाडी सपशेल फोल ठरली.
  • अशोक भांगरेचा मधुकर पिचडांनी ३५ हजाराच्या फरकाने त्यावेळी पराभव केला.
  • त्यानंतर दुध संघाच्या चेअरमनपदी वर्णी.
  • १९८८ साली अगस्ती सागर कारखाना स्थापना झाला त्यात ते संचालक झाले.
  • अकोले तालुका एज्यकेशन विश्वस्त संचालक.
  • अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे फाऊंडर अध्यक्ष.
  • अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक, मधुकर पिचडांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केल.
  • आता पुन्हा जिल्हा बँकेचे बिनविरोध संचालक.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *