अधिकाऱ्यांच्या अंगावर शाई फेकणे पडले महागात

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे : महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी आपल्या मागण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोचे संचालक वैज्ञानिक  हेमंत आडे यांच्यावर शाई फेकल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी  भारतीय मानक ब्यूरोच्या वतीने मोठ पाऊल उचलण्यात आले आहे.

बाजारात ISO  प्रमाणपत्र नसलेल्या पाणी बॉटल विक्री करणाऱ्या कंपन्याचा सुळसुळाट झालाय अशा कंपन्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या दाधिकाऱ्यानी भारतीय मानक ब्यूरोचे संचालक वैज्ञानिक हेमंत आडे यांच्याकडे केली होती. त्या बॉटल कंपन्यावर कारवाई करणे माझ्या अधिकारात नसून ते अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारात असल्याचं सांगून देखील असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी हेमंत आडे यांच्यावर शाई फेकली होती.

भारतीय मानक ब्यूरोकडून तपासणीसाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या पाणी बॉटलचे नमुने  घेण्यात येतात . काही दिवसापूर्वी भारतीय मानक ब्यूरोकडून  महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या कंपनीच्या पाणी बॉटल तपासणीसाठी घेण्यात आल्या होत्या. या रागातून आडे यांच्यावर ही शाई फेक करण्यात आल्याचं  सांगण्यात येतंय.

दरम्यान या सगळ्या घटनेनंतर अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि बीआयएस ॲक्ट २०१६ चं  उल्लंघन केल्याप्रकरणी  बीआयएसने महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे  परवाने रद्द केले आहेत. यात शिवांजली ॲक्वा, सॅवी प्युअर ॲक्वा, युनिट-२ आणि रवी फुड्स अँड बेव्हरेजेस यांनाही बीआयएसने परवाने रद्द करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *