‘स्वतःची उमेदवारी जाहीर करणं माझ्यासाठी विशेष’-प्रियांका चोप्रा

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: भारतातर्फे प्रत्येक वर्षी ऑस्करसाठी सिनेमे पाठवले जातात पण ते सिनेमे ऑस्करच्या ज्युरींना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरतात आणि बाहेर फेकले जातात. यावर्षीही भारतातर्फे मल्याळम भाषेतील ‘जलीकट्टू’ सिनेमा ९३ व्या ऑस्कर पुरस्काराच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरी साठी पाठवण्यात आला होता. पण १५ सिनेमांच्या अंतिम यादीतही हा सिनेमा आपले स्थान मिळवू शकला नाही आणि ऑस्करच्या रेस मधून बाहेर गेला. एकता कपूरने तयार केलेला ‘बिट्टू’ लघुपट मात्र ऑस्करच्या अंतिम यादीत समाविष्ट झाला होता तोही नंतर बाहेर पडला.

प्रियांका चोप्रा आणि राजकुमार रावच्या द व्हाईट टायगरला ‘बेस्ट ॲडाप्टेड स्क्रीनप्ले’साठी नामांकन मिळालं आहे. ‘द व्हाइट टायगर’ हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या ‘द व्हाइट टाइगर’ या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. दिल्लीतस्थित एका श्रीमंत जोडप्याची भूमिका प्रियांका-राजकुमार यांनी साकारली होती. चित्रपटात अभिनेता आदर्श गौरव त्यांच्या कारचालकाची म्हणजेच बलराम ही भूमिका केली आहे. श्रीमंत होण्याची स्वप्न पाहणारा बलराम त्याला शक्य होईल तितके प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मात्र, एका वळणावर श्रीमंत होण्याच्या ध्येयाने पछाडलेला बलराम चुकीच्या मार्गाला लागतो आणि या चित्रपटाची संपूर्ण कथा पालटते. या चित्रपटाचं दिग्दर्शन रमिन बहरानी करणार आहेत. तर मुकुल देवडा या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

नामांकनांची घोषणा झाल्यावर प्रियांका चोप्रा, राजकुमार राव, आदर्श गौरव यांच्यासह चित्रपटाशी निगडीत सर्वच कलाकारांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. प्रियंकाने हा आनंद साजरा करत इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘नुकतेच आम्हाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. रमिन आणि संघाचे अभिनंदन. स्वत:ची उमेदवारी जाहीर करणे माझ्यासाठी विशेष होते. सर्वांचा अभिमान आहे.’

या प्रकारात ऑस्कर जिंकण्यासाठी व्हाईट टायगरला बोराट सब्सिक्वेंट मूवीफ़िल्म, द फादर, नोमैडलैंड आणि वन नाइट इन मायामी यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. जगातील सर्वात लोकप्रिय अवॉर्डचं दोन भागात लाईव्ह प्रेझेंटेशन करण्यात आलं.. यात २३ वेगवेगळ्या  विभागात नामांकन देण्यात आली. नॉमिनेशनचे प्रसारण अ‍ॅकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब ग्लोबल लाईव्हवर प्रसारीत करण्यात आले. जगातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे ऑस्कर सोहळा उशिरा पार पडणार आहे. हा सोहळा फेब्रुवारीत पार पडतो. यावेळी हा पुरस्कार २६ एप्रिलला होणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *