Sunday, September 25, 2022
HomeUncategorizedलाखोत व्हिव्ज मिळाले, पण 'त्या' दोन शब्दांमुळे ट्रोल व्हावं लागतंय!

लाखोत व्हिव्ज मिळाले, पण ‘त्या’ दोन शब्दांमुळे ट्रोल व्हावं लागतंय!

ब्रह्मास्त्र’च्या निर्मात्यांना ‘केसरिया’ आधीच रिलीज करायचा नव्हता. पण लोकांच्या प्रतिसादाने त्यांना मार्केटिंग स्ट्रैटेजी बदलण्यास भाग पाडले.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया’ गाण्याचा टीझर १३ एप्रिल रोजी रिलीज झाला होता. आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच रोमँटिक ट्रॅकमध्ये दिसले आणि दुसऱ्याच दिवशी दोघांचेही लग्न झाले. ‘केसरिया’चा 40 सेकंदाचा टीझर पाहून संपूर्ण गाण्याबद्दल खळबळ उडाली होती.

हे संपूर्ण गाणे १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. 15 जुलैला रिलीज झाले पण ते ‘केसारिया’ नसून त्याच्या ‘शमशेरा’ चित्रपटाचा टायटल ट्रॅक होता. ‘शमशेरा’च्या गाण्याशी टक्कर होऊ नये म्हणून ‘केसरिया’चे रिलीज पुढे ढकलण्यात आल असल्याचे बोलले जात आहे.

अखेर 17 जुलै रोजी केशरिया गाणे प्रदर्शित झाल. 24 तासांत ह्या गाण्याने युट्युबवर धुमाकूळ घातली. हे गाणे सतत ऐकले जात आहे, पण प्रेक्षकांची सुई एका जागी अडकली ते म्हणजे या गाण्यात वापरण्यात आलेल्या ‘लव्ह स्टोरीज’ या शब्दावर. या गाण्याला इतके ट्रोल केल्या गेले की, त्यावर मीम्स देखील बनविण्यात आले.

हे गाणे अमिताभ भट्टचार्य यांचे असून अरिजित सिंगने गायले आहे. गाण्याला कंपोज प्रीतमने केले आहे.

नवीन कुकरेजाने ट्विटर लिहिले,

एका वापरकरत्याने –

‘केसरिया’ गाणे रिलीज झाल्यानंतर गीतकार अमिताभ भट्टाचार्य प्रेक्षकांचा निशाण बनला होता.

श्रोत्यांचे म्हणने होते की, ‘केसरिया’ मध्ये यमक जुळवण्यासाठी त्यांनी गाण्यात ‘लव्ह स्टोरिया’ हा शब्द टाकला की काय? त्याऐवजी ते ‘प्रेम कहानियां’,’इश्केदारियां’ यासारखे शब्दही
वापरू शकत होते. जणे करून गाणं ऐकताण विचित्र वाटणार नाही. कारण गाण्यात हिंदी आणि उर्दूमध्ये इंग्रजीचा वापर केल्याने लोकांना अडथडा निर्माण होत आहे.

मात्र, अमिताभ यांनी असा एक्सपेरिमेंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा एक्सपेरिमेंटसाठी तो ओळखला जातो. एकप्रकारे हा त्यांचा यूएसपी राहिला आहे. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी यामुळेच लक्षात राहातात. मग ते ‘ए दिल है मुश्कील’ मधलं ‘द ब्रेकअप सॉन्ग’ असो किंवा ‘देव डी’ चित्रपटातील ‘इमोशनल अत्याचार’ हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत असलेले गाणे आहे.

हिंदी गाण्यांमध्ये इंग्रजी शब्दांची फ्युजन नवीन नाही. अनेक प्रसंगी गाण्यांचाही तो आकर्षक भाग बनला आहे. पण या गाण्यात ते जमू शकले नाही. ‘केसरिया’मधील इंग्रजीबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत कारण लोकांना गाण्याचा टीझर आवडला आहे. पण गाण्यातील ‘लव्ह स्टोरीज’ या शब्दाने मज्जा घालवली.

केसरीया हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला आहे. या सर्व आवृत्त्या सिड श्रीराम यांनी गायल्या आहेत. ‘केसरिया’पेक्षा सिडने गायलेल्या गाण्यांचे अधिक कौतुक होत आहे. सिड श्रीरामाची गाणीही तुम्ही ऐकली असतील. त्यांनी ‘पुष्पा’ मधील ‘श्रीवल्ली’ या हिट गाण्याचे ओरिजनल वर्ज़न गायलेले आहे. यासोबतच ‘इश्क: नॉट अ लव्ह स्टोरी’ या मल्याळम चित्रपटासाठी रेकॉर्ड केलेले ‘परायुवान’ हे गाणेही खूप प्रसिद्ध होते.

टीझरला मिळालेल्या प्रतिसादामुळे मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलवली

तर, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने सांगितले ह की, ‘केसरिया’ गाण्याआधी रणबीरच्या शिवा या पात्राशी संबंधित एक गाणे रिलीज होणार होते. पण ‘केसरिया’च्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याला आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलावी लागली.

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 09 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकारही दिसणार आहेत.

अधिक वाचा :

राजकुमार रावचा ‘हिट: द फर्स्ट केस’ रिलीज; वाचा काय आहे स्टोरी?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments