पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकाविणाऱ्या ईशान किशनची होतीये प्रशंसा

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

अहमदाबाद: पहिल्या टी-२० सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने वचपा काढत इंग्लंड विरुद्धच्या दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. पदार्पणाच्या सामन्यात ईशान किशन याने अर्धशतक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निवृत्त क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने त्याचे कौतुक केले आहे. त्याच बरोबर अनेक खेळाडूंनी सुद्धा ईशान किशनच्या खेळाचे प्रशंसा केली आहे.

मुंबई इंडियन्सने २०१८ मध्ये ईशान किशनला आपल्या ताफ्यात समाविष्ठ करून घेतले होते. ईशानसाठी मुंबई इंडियन्सने ६.२ कोटी रक्कम मोजली होती. ईशानने आयपीएलच्या या १३ व्या मोसमात तडाखेदार कामगिरी केली. ईशानने एकूण १४ सामन्यात ५१६ धावा केल्या. ईशान यामोसमात सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज ठरला आहे. ९९ ही त्याची या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलच्या १३ व्या मोसमात मुंबईने पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं.

मुंबईच्या या विजयात सर्वच खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. मात्र इशान किशनने यावेळेस उठावदार कामगिरी केली आणि ईशान टीम इंडियामध्ये महेंद्र सिंह धोनीची जागा घेण्यास तयार आहे, असा दावा निवड समितीचे माजी अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी त्यावेळी केला.

इंग्लडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात, स्वतःच्या पदार्पणाच्या सामन्यातच आक्रमक अर्धशतक झळकावून यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला. किशनने आपल्या ३२ चेंडूंमध्ये ५६ धावांच्या दमदार खेळीत चौकार आणि षटकारांची बरसात करत आपली निवड इंडियन क्रिकेट टीमसाठी अचूक असल्याचं दाखवून दिलं. 

इंग्लंड विरोधात पहिल्या टी-२० मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाने काल झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत इंग्लंडला सात विकेट्स राखून धूळ चारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात १७.५ ओव्हरमध्ये पूर्ण करत मागच्या परभवाचा वचपा काढला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरीही साधली.

ईशान किशनने सुरवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाची हवा काढली व भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. या आक्रमक खेळीमुळे सोशल मीडियावर ईशान किशनचं सर्वत्र कौतुक होतंय. पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतक खेळून स्वतःला सिद्ध केल्यामुळे ईशानवर अभिनंदनाच्या ट्विट्सचा वर्षाव होतोय. सगळेच दिग्गज लोक त्याचं अभिनंदन करतायत. या दमदार कामगिरीसाठी किशनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पण, त्याने हा पुरस्कार आपल्या प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पित केला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *