इतिहासातील हा ही एक मोठा राजकीय ‘खून’?

घटना होती ११ फेब्रुवारी १९६८ सालची… बजेट सत्रावर आधारित अटल बिहारी वाजपेयी यांनी मीटिंग बोलावली होती. मीटिंग चालू असतानाच सगळ्यांनाच धक्कादायक बातमी मिळाली कि, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मुग़लसरायला रेल्वेमध्ये खून झाला. हे ऐकून अटल बिहारी वाजपेयी भर मिटिंग मध्येच धाय मोकलून रडले. संपूर्ण देशासाठी भारतीय जनसंघाचे अध्यक्षांचा खून होणे हा फार गंभीर आणि मोठा चर्चेचा विषय बनला होता. महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर भारतात राजकीय खून होण्याची ही सर्वात मोठी घटना मानली गेली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा खून कोणी केला व का केला हे आत्तापर्यंतचे एक गूढ राहीले आहे.
विद्यार्थिदशेत असतानाच पंडित जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या संपर्कात आले आणि संघात दाखल झाले. संघाचा प्रचार करत करत त्यांनी ‘राष्ट्रधर्म’ नावाचे मासिक काढले आणि ‘पांचजन्य’ व ‘स्वदेश’ नावाच्या वृत्तपत्राची स्थापना देखील केली होती. १९५१ मध्ये भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना झाली आणि दीनदयाळउपाध्याय सक्रिय राजकारणात उतरले. ते पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यानंतर १९६७ साली ते जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले . पंडितांनी देशाला एकात्म मानवतावादाचा सिद्धांत दिला आणि त्याच सिद्धांताला आज भारतीय जनता पक्ष आपली विचारधारा मानतो.
तर त्यांचा हा त्याचा प्रसंग असा होता की, १९६८ च्या फेब्रुवारी मध्ये पंडित दीनदयाळएका मीटिंगच्या निमित्ताने लखनऊ वरून दिल्लीला रेल्वेने निघणार होते. दिल्लीमध्ये जी मीटिंग आयोजित करण्यात आली होती ती संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पक्षाची भूमिका काय असावी याची चर्चा करण्यासाठी राष्ट्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना या बैठकीला जाणे आवश्यक होते. परंतु जनसंघ खालच्या पक्षाचे बिहार प्रांताचे अध्यक्ष अश्विनीकुमार यांच्या सांगण्यावरून पंडित पठाणकोट- सियालदा माझी एक्सप्रेसमधून पाटण्याला निघाले होते. गाडी पाटण्याला पोहोचली होती आणि त्यांना घ्यायला जनसंघाचे नेते कैलासपती मिश्र रेल्वे स्टेशनवर आले होते. परंतु दीनदयाळ हे त्यांच्या आरक्षित डब्यामध्ये कुठेच दिसले नाही. पंडित सर दिल्लीतील बैठकीसाठी निघून गेले असावे असा त्यांचा समज झाला आणि ते निघून गेले आणि इकडे स्टेशनच्या रेल्वेपटरीवर एका मृतदेह आढळला होता आणि बघ्यांची गर्दी वाढतच जात होती.
तेथील का रेल्वे स्टेशनच्या कर्मचाऱ्याने मृतदेहाची ओळख पटली त्याच्या लक्षात आलं की हे दुसरे तिसरे कोणी नसून जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळउपाध्याय आहेत. लागलीच त्यांनी संघाच्या स्थानिक स्वयंसेवकांना बोलावले. मग खात्री झाली कि ते पंडित दीनदयाळउपाध्यायच आहेत. आणि अधिकृतपणे घोषित करण्यात आलं की पंडितजींचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासातून पोलिसांनी पंडित उपाध्यायांच्या काही गायब झालेल्या वस्तूंचा शोध घेतला पण त्याचबरोबर त्यांना काही पुरावे देखील हाती लागले. त्यांनी तीन संशयित लोकांना ताब्यात घेतलं आणि पंडितजींच्या सुटकेस, शॉल, कोट आणि त्यांचे अंथरूण असे सामान मिळाले. पंडितजीचा मृत्यू झाल्यानंतरची ही चोरीची घटना होती हे तपासातून स्पष्ट झाले. परंतु दुसरे काहीच पोलिसांच्या हाती लागले नाही. त्या नंतर ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. मात्र सीबीआय देखील अंतिम तपासा पर्यंत पुराव्याअभावी पोहोचू शकली नाही. चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या तिघांना पुराव्याअभावी हत्याच्या प्रकरणातून मात्र क्लीन चिट देण्यात आली.
मात्र यानंतर त्यांची हत्या ही राजकीय कटातून झाली असे आरोप अनेकदा अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरती झाले होते. त्यांच्यासमवेत नानाजी देशमुख देखील या कारस्थानात सामील आहेत असा धडधडीत आरोप हे पक्षातून बेदखल झालेल्या बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रच्या तिसऱ्या खंडात लिहिले होते. त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि नानाजी देशमुख यांना पक्षातील महत्वाच्या पदापासून लांब ठेवत बलराज मधोकला महत्वाचे पद देऊ केले हे त्यांना पचनी पडले नाहीं म्हणून त्यांनी पंडितजीच्या हत्येचा कट रचला आणि भाडोत्री आरोपिंकडून हा कट यशस्वी केला असं म्हणलं गेलं आहे. पण त्यांच्या या आरोपांना कुणीच गांभीर्याने घेतलं नाही.
पंडितजीच्या जाण्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांना जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पद देण्यात आले. ते चार वर्ष या पदावर कार्यरत होते आणि त्यानंतर ते पद लालकृष्ण अडवाणी यांना सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर कानपुर मध्ये पार पाडण्यात आलेल्या अधिवेशनात बोलतांना बलराज मधोक यांनी संघाच्या आर्थिकतेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ह्यामुळे त्यांना अडवाणी यांनी पक्षातून बेदखल केले. तेच बलराज मधोक जे खुद्द पक्षाचे संस्थापक होते तसेच पक्षाचे संविधान लिहिणाऱ्यांमधले एक होते.
मधोक यांनी केलेले आरोप त्यांनी पक्षातून हाकालपट्टी केल्यानंतरचे होते त्यामुळे ते खरे कि खोटे हे स्पष्ट होत नाहीत. परंतु त्यांनी केलेले आरोप हे काही तर्कावरून खरेही वाटतात. जसे कि, सुब्रमण्यम स्वामी हे मुंबई येथून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले असताना, मोरारजी देसाई यांच्या सरकारद्वारे दीनदयाळउपाध्याय यांच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी असा आग्रह केला होता परंतु तत्कालीन विदेश मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या पदाचा वापर करत या प्रकरणाच्या चौकशीला पुन्हा बंद करण्यात यशस्वी झाले होते. परंतू अजून एका धक्कादायक बाब म्हणजेच बलराज मधोक यांनी आरोप केलेल्या नानाजी देशमुख यांनीच एकदा नागपूरच्या एका भाषणात असा उल्लेख केला होता कि पंडितजीची हत्या ज्यांनी केली ते फक्त मोहरे आहेत तर त्यांचा करवता धनी वेगळाच असावा, कारण पंडितजींच्या जवळ काही गोपनीय दस्तादेवज होते ज्याद्वारे सरकारचा भ्रष्टाचार समोर येण्याची शक्यता होती त्यामुळे ते कागदपत्रे हाती लागण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप त्यांनी त्या दरम्यान केला होता.
त्यानंतर देखील एकदा विरोधी पक्षांच्या मागणीवरून इंदिरा गांधी सरकारने १९६९ मध्ये न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पंडित दीनदयाळउपाध्याय यांच्या हत्येच्या चौकशीच्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. परंतु न्या. चंद्रचूड यांनीदेखील ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा निष्कर्ष काढला. परंतु या वर ना भाजपाच्या नेत्यांचा विश्वास आहे ना काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास आहे. त्यामुळे पंडितजींची हत्या हा नियोजित कट असावा कि दरोड्यातील खून असावा याबाबतीतचे गूढ अजूनही कायम आहे.