राज्य सरकारच चाललय काय? विद्यार्थ्यांचा सवाल
पुन्हा एकदा एमपीएससीची पूर्वपरीक्षा लांबणीवर
पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. तर काही ठिकाणी लॉक डाऊन लावण्यात आले आहे.
शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात येत असल्याचे आयोगाने जाहीर केले. परीक्षेची सुधारित तारीख यशावकाश जाहीर करण्यात येईल, असंही आयोगानं या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे
यासंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी ११ मार्च रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात असे म्हटलंय की ‘ आयोगाला राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून १० मार्च रोजी यासंदर्भातले निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आलंय की, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी वेगवेगळे निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करणे योग्य नसल्यानं ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.’
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली.