कायदा समान आहे ना सर्वांना? रश्मी शुक्ला स्वत:ला सर्वश्रेठ समजत आहेत का? – अमोल मिटकरी

अकोला : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज रोजी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप असून बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या चौकशीला रश्मी शुक्ला यांनी नकार दिला असून यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कायदा समान आहे ना सर्वाना? असा प्रश्न त्यांनी ट्विट करुन उपस्थीत केला आहे. या ट्विट मध्ये त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सुध्दा फोटो शेअर करून ‘संपुर्ण चौकशीला सहकार्य करणारे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख’ आणी दुसरीकडे ‘Article 14 ला राज्यपाल आणि राष्ट्रपती फक्त अपवाद ठरु शकतात मग रश्मी शुक्ला सायबर पोलिसांच्या चौकशीला अनुपस्थित राहून स्वत:ला सर्वश्रेठ समजत आहेत का?’ असा असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी?
आमदार अमोल मिटकरी यांनी आज रश्मी शुक्ला यांनी चौकशीला नकार दिल्या नंतर ट्विट केले आहे यामध्ये त्यांनी कायदा समान आहे ना सर्वाना? असा प्रश्न करुन यामध्ये ‘संपुर्ण चौकशीला सहकार्य करणारे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख’ आणी दुसरीकडे चौकशीला सामोरे न जाणाऱ्या रश्मी शुक्ला यांचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ‘Article 14 ला राज्यपाल आणि राष्ट्रपती फक्त अपवाद ठरु शकतात मग रश्मी शुक्ला सायबर पोलिसांच्या चौकशीला अनुपस्थित राहून स्वत:ला सर्वश्रेठ समजत आहेत का?’ असा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थीत केला आहे.
काय आहे प्रकरण?
आयपीएस रश्मी शुक्ला ह्या एसआयपी मध्ये कार्यरत असताना त्यांनी काही मंत्र्याचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विभानसभा निवडणूकीच्या दरम्यान त्यांनी काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले असल्याचा एसआयपीमध्ये कार्यरत असताना रश्मी शु्क्ला यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. तसेच भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदारांना फोन करुन धमकावणे असे सुद्धा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहेत.
का दिला चौकशीला नकार?
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी काल रात्री उशिरा पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, वरिष्ठ अधिकारी केंद्रिय राखीव पोलिस दलाचे महासंचालक कुलदीप यांना एक ई मेल पाठविला आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबईसह हैद्राबाद मध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या कारणामुळे प्रवास करता येणार नाही. व आपल्याकडील अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे आता आपल्याला प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही असा ई मेल त्यांनी केला आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर प्रतिनियुक्तीवर आहेत.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 28, 2021