Irfan Khan 1st Death Anniversary : मुलगा बाबिलने इरफानच्या शेवटच्या क्षणाच्या काही आठवणी केल्या शेअर

Son Babil shares some memories of Irfan's last moments
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप सोडणारे दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने इरफानचा मुलगा बाबिलने आपल्या वडिलांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. २९ एप्रिल २०२० रोजी न्यूरोइंडोक्राइन ट्यूमर या जीवघेण्या आजारामुळे इरफान खान यांचे निधन झाले होते.

‘फिल्म कंपॅनियन’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बाबीलने वडिलांच्या शेवटच्या क्षणांच्या आठवणी सांगताना म्हंटले आहे की, ‘त्या शेवटच्या दोन दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होतो. ते काहीसे बेशुद्ध होत होते. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले मी मरणार आहे, त्यावर मी म्हटलं नाही असं काही नाही होणार. त्यानंतर ते हसले आणि झोपून गेले.’

इरफान खानने तलवार, पानसिंग तोमर, लाइफ ऑफ पाई, हिंदी मीडियम सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. अंग्रेजी मीडियम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. कॅन्सरवर मात करत इरफान यांनी या चित्रपटातून पुनरागमन केले होते. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *