Wednesday, September 28, 2022
Homeथेटर ते स्टेडीयमआयपीएल: 'हे' आहेत नियमांमधील बदल!

आयपीएल: ‘हे’ आहेत नियमांमधील बदल!

मुंबई: संघांचे नवे नाव, नवे सहकारी, नवी जर्सी, नवे प्रायोजक… अशी नाविन्यपूर्ण आयपीएल यंदा होणार आहे. आयपीएलच्या १४ व्या सत्रासाठी नियमांतही बदल झाले आहेत. सामन्याची वेळ ते सुपर ओव्हरच्या नियमात बदल झाला. त्यामुळे ८५ मिनिटांचा खेळ व पाच मिनिटांच्या टाइम आऊटमुळे पहिला डाव ९० मिनिटांत पूर्ण करणे सक्तीचे असेल. सुपरओव्हर सामन्यानंतर तासाभरात होईल. चेन्नईच्या स्टेडियममध्ये गत चॅम्पियन मुंबई व बंगळुरू सामन्याने ९ एप्रिल रोजी स्पर्धेला सुरुवात होईल. नियम १ एप्रिलपासून लागू होतील. बीसीसीआयने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नियमांत झालेले बदल-

९० मिनिटांत डाव पुर्ण करणे असेल सक्तीचे;

मिनिमम ओव्हर रेट : गत सत्रात डावाचे अखेरचे षटक ९० व्या मिनिटाला सुरू असेे. आता कलम १२.७.१ नव्या नियमानुसार विनाअडथळा लढतीत एक डाव ९० मिनिटांत पूर्ण होईल. म्हणजे, ८५ मिनिटांचा खेळ व ५ मिनिटांचा टाइम-आऊट असेल. संथ फलंदाजी करणाऱ्या टीमवर कारवाई करण्याचा अधिकार आता पंचांना असेल.

सुपर ओव्हर-

विनाअडथळा मॅच बरोबरीत राहिल्यानंतर सामना संपल्यापासून ते तासाभरात सुपर ओव्हर.

नो बॉल-

यादरम्यान मैदानावरील पंचांनी दिलेला नो बॉलचा निर्णय हा परिस्थितीनुसार तिसरे पंच बदलू शकतील.

शॉर्ट रन-

थर्ड अंपायर हे शॉर्ट रन तपासणार आहेत. आता त्यांच्याकडे मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्याचा एक पर्याय असेल. २०१९ आयपीएलमध्ये पंजाब-दिल्लीच्या सामन्यानंतर शॉर्ट रनचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पंजाबची मालकीण प्रीती झिंटाने अधिकृत तक्रारदेखील केली होती. यासाठी नवीन नियम तयार झाला.

सॉफ्ट सिग्नल-

जर-तरच्या परिस्थितीत मैदानावरील पंच सॉफ्ट सिग्नल देणार नाही. अनेक वेळा संभ्रम निर्माण होताे. यापूर्वी, पंचांनी निर्णय हा थर्ड अंपायरकडे रेफर केला, त्याला सॉफ्ट सिग्नलअंतर्गत पहिल्या निर्णयाला मान्यता मिळत होती. भारत-इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान ‘सॉफ्ट सिग्नल नियम’ बाबत गोंधळ उडाला होता.

चेन्नई व मुंबईपाठोपाठ आता पंजाबनेही आपल्या जर्सीत बदल केला. फ्रँचायझीने नव्या नावासह मंगळवारी जर्सी जाहीर केली. दुखापतीमुळे अय्यरच्या जागी ऋषभ दिल्लीचे नेतृत्व करणार आहे. आयपीएल २०२१ चे १२० देशांत थेट प्रक्षेपण होईल. त्याचबरोबर, भारतात मराठीसह ८ भाषांत सामन्यांचे समालोचन दाखवले जाईल, ज्यात हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, बंगाली, कन्नड व मल्याळमचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments