मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे द्या
ठाणे कोर्टाचा एटीएसला आदेश
मुंबई: ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास तत्काळ थांबवा, असे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायादंडाधिकारी कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला केला आहे. तपास थांबवून सर्व कागदपत्रे एनआयए कडे देण्यात यावे असेही आदेशात म्हटले आहे.
मनसुख हिरेन यांचा हत्येचा तपास केंद्र सरकारने एनआयए कडे दिला आहे. अशी अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आली आहे. तरीही एटीएसने आपला तपास सुरु ठेवला आहे. आणि आरोपींची कोठडी मिळवत आहे. एटीएसने तपास थांबवून तत्काळ कागद पत्रे आम्हाला द्यावीत असा अर्ज एनआयए ठाणे न्यायालयात केला होता. त्यावर हा आदेश न्यायालयने दिला.
मनसुख हिरेन कोण आहेत?
गेल्या महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेले स्कोर्पिओ आढळून आली होती. तपासात ही गाडी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याचे समोर आले होते. ही गाडी अंबानी यांच्या घरासमोर कशी आली याचा तपास सुरु असतांना हिरेन यांचा मृत्यू झाला होता. हिरेन यांच्या पत्नी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हिरेन यांची हत्या करण्यात आली. टी हत्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केला असल्याची नोदाविले होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि मनसुख हिरेन यांची हत्या यांचा काय संबंध आहे याचा तपास करत आहे. एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. तर मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएस करत होते.