Friday, October 7, 2022
Homeराजकीयवाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलिसांचा अपमान

वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलिसांचा अपमान

सामनातून टिका

मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकारण तापले आहे. सामनातून या प्रकरणावर टिका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि भाजपवर टिका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात काही खुट्ट झाले की, केंद्रीय तपास यंत्रणा धाव घेते. अलीकडे हे जणू केंद्रसरकारचे धोरण झाले आहे. अंबानी हे आपल्या देशातील बडे प्रस्थ आहे. त्यांच्या सुरक्षेत कुठलीही खोट असता कामा नये. म्हणूनच त्यांच्या घरासमोर सापडलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या व त्यानंतर झालेला मनसुख हिरेन यांचा मृत्यू हे दोन्ही प्रकार गंभीरच आहे, म्हणून या प्रकारांचा तपास मुंबई पोलिसांना जमणार नाही केंद्र सरकार परस्पर कसे काय ठरवू शकते. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींना फासावर लटकाविणारे जसे मुंबई पोलीस आहे तसे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील कसाबसारख्यांना प्राणाची बाजी लावून पकडणारे व फासावर लटकवणारेही मुंबई-महाराष्ट्र पोलीस दल आहे. असे लेखात म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या क्षमता व शौर्य यांची वाहवा जगभर असतांना २० जिलेटनच्या कांड्यासाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे, हे आश्चर्य आहे, असे सामनात म्हटले आहे. सचिन वाझे यांचे काही चुकले असेल व २० जिलेटीन कांड्यात ते जर दोषी असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादी विरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यानी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडविले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याचा स्वायतेवर घाला घालत आहे. सत्य लवकर बाहेर येईल, असेही लेखात म्हटले आहे.                        

वाझे यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षात जे आनंदाचे भरते आले आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडावेत. “वाझे यांना अटक झाली हो” असे गर्जत हे लोक रस्त्यावर यायचे तेवढे बाकी आहेत. या आनंदाचे कारण असे की, काही महिन्यापूर्वी याच वाझे यांनी रायगड पोलिसांच्या मदतीने भाजपवाल्यांच्या महंत अर्नब गोस्वामी यास अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात बेड्या ठोकल्या होत्या. त्यावेळी हे सर्व लोक गोस्वामी यांच्या नावाने रडत होते व वाझे यांना शाप देत होते. थांबा, बघू केंद्रात आमचीच सत्ता आहे. असे सांगत आहे. तो मोका साधला असून २० जिलेटीनच्या कांड्याच्या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आल्याचे अग्रलेखात लिहिले आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments