Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचाकोरोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी राज्यपालांनी दिल्या सूचना

कोरोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी राज्यपालांनी दिल्या सूचना

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर भार पडला असून सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोरोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या, अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केली आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी राज्यपालांनी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केली. सैन्यदलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्यदलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील कोरोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments