जगातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांच्या यादीत भारतीय शिक्षण संस्थांची बाजी

नवी दिल्ली: जगातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांच्या यादीत २५ भारतीय अभ्यासक्रमांची निवड झाली आहे. केंद्रीय विकास मंत्रालयाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम बारा भारतीय शिक्षण संस्थांद्वारे देण्यात येतो.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी निवड झालेल्या सर्व शिक्षण संस्थांचे अभिनंदन केले आहे. भारतीय शैक्षणिक संस्थांनी जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. त्यांचा सार्थ अभिमान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उच्च शिक्षणात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा त्याच प्रयत्नांचा चांगला परिणाम असल्याचे पोखरियाल यांनी सांगितले.
क्यू. एस. वर्ल्ड युनिवर्सिटीने जाहीर केलेल्या सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांच्या यादीत जगातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांमध्ये १२ भारतीय शिक्षण संस्थांनी बाजी मारली आहे. यामध्ये २५ अभ्यासक्रमांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या बारा संस्था:-
- आयआयटी बॉम्बे
- आयआयटी दिल्ली
- आयआयटी मद्रास
- आयआयटी खडगपूर
- आयआयएससी बंगळूरु
- आयआयटी गुवाहाटी
- आयआयएम बंगळुरू
- आयआयएम अहमदाबाद
- जेएनयू
- अण्णा विद्यापीठ
- दिल्ली विद्यापीठ
- ओपी जिंदल विद्यापीठ
या विद्यापीठांचा यात समावेश आहे. भारतीय शिक्षण संस्थांच्या या कर्तृत्वाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.