भारताचा कसोटी मालिकेवर कब्जा

याबरोबरच भारताने कसोटी विश्वचषकाच्या फायनल प्रवेश मिळविला आहे.
अहमदाबाद : इंग्लंड विरोधातील चौथा कसोटी सामना भारताने एक डाव आणि २५ धावांनी जिंकला. भारताने कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. या विजयाबरोबर भारतीय संघ कसोटी विश्वचषकाच्या फायनल मध्ये पोहचला असून न्यूझीलंड बरोबर भारताचा सामना होणार आहे.
अहमदाबाद येतील नरेंद्र मोदी या मैदानावर खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना होता. भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ३६५ धावा काढल्या. यामुळे भारताला १६० धावांची आघाडी मिळाली होती. इंग्लंडच्या बेन स्टोक ४ विकेट, जेम्स एंडरसन ने ३ तर जैक लीच याने २ विकेट घेतल्या होत्या. भारतीय संघाला आघाडी मिळवून देण्यात रिषभ पंत (१००) आणि वॉशिगंटन सुंदर (९६) यांचे मोठे योगदान होते. दुर्दैवाने सुंदरचे शतक होऊ शकले नाही.
C.H.A.M.P.I.O.N.S! 🏆 👏 🇮🇳#TeamIndia @Paytm #INDvENG pic.twitter.com/i4KWDxx2Ml
— BCCI (@BCCI) March 6, 2021
दुसऱ्या डावात इंग्लंड काही तरी कमाल करेल याची आशा होती. मात्र सात नंबरवर खेळायला आलेल्या डारेन लॉरेन्स वगळता एकाही फलंदाज खेळपट्टी वर जास्त काळ थांबू शकला नाही. भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि आर. आश्विन यांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात प्रत्येकी ५ गाडी बाद केले.
इंग्लंडच्या संघला दुसऱ्या धावत केवळ १३५ धावा काढता आल्या. यामुळे भारताने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकला. सामन्या बरोबरच भारताने कसोटी मालिकेवर ३-१ णे कब्जा केला आहे.