जगातील सर्वाधिक ३० दूषित शहरांपैकी २२ भारतात

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली: सलग तिसर्‍या वर्षी नवी दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरली आहे. स्वीसच्या IQ Air या संस्थेने आपल्या एअर क्वॉलिटी अहवालातून हे पुढे आणले आहे. जगातील सर्वाधिक दूषित ३० शहरांपैकी २२ ही भारतातील आहेत. आयक्यू एअरच्या २०२० च्या जागतिक वायु गुणवत्तेच्या या अहवालात १०६ देशांमधील डेटा संकलित केला आहे. फुफ्फुसांचे नुकसान करणारे वायुजनित कण पीएम २.५ वर आधारित हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणारे, स्विश ग्रुप आयक्यू एअरच्या (IQ Air) अभ्यासामध्ये ही बाब समोर आली आहे. हा अहवाल देशाच्या वार्षिक सरासरी पार्टिकल्युलेट पीएम २.५ वर आधारित आहे.

भारताचा विचार करता दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण पहायला मिळतंय. या शहरातील प्रदूषणाच्या समस्येमध्ये गेल्या काही वर्षामध्ये वाढ झाली असून त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयंही काही काळापूरती बंद करावी लागतात. उद्योगधंद्यानी प्रदूषणाच्या नियमांचे पालन न करणे आणि शेजारील पंजाब, हरियाणा या राज्यात शेतीतील पराली म्हणजेच उत्पादन काढल्यानंतर उरलेला पालापाचोळा जाळला जातोय. त्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होतेय.

दिल्लीसह गाजियाबाद, बुलंदशहर, बिसरख जलालपुर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपुर, लखनऊ, मेरठ, आगरा, मुजफ्फरनगर, भिवाड़ी, फरीदाबाद, जींद, हिसार, फतेहाबाद, बंधवाड़ी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक, धारुहेड़ा, मुजफ्फरपुर ही देशातील प्रदूषित शहरे आहेत. रिपोर्टनुसार चीनचे शिंजियांग हे सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.

लॉकडाऊनमुळे पीएम २.५ पातळी वार्षिक सरासरी ११% ने कमी झाली आहे. असे असूनही, बांगलादेश  आणि पाकिस्ताननंतर भारत तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. सध्या देशातील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर आहे. २०१९ च्या तुलनेत दिल्लीची हवेची गुणवत्ता २०२० मध्ये सुधारली आहे. परंतु या सुधारणेनंतरही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा दहावा क्रमांक लागतो. परंतु राजधानीच्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे.

जगभरातल्या ४० प्रदूषित शहरांच्या यादीत ३७ शहरे केवळ दक्षिण आशियातील आहेत. त्यामुळेच दक्षिण आशियातील १३ ते २२ टक्के लोकांचा प्रदूषणामुळे मृत्यू होतोय. दक्षिण आशियातील या प्रदूषणाचा परिणाम केवळ लोकांच्या आरोग्यावरच होत नसून संबंधित देशांच्या एकूण जीडीपीच्या ७.४ टक्के जीडीपीचे नुकसान प्रदूषणामुळे होतंय. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशातील वायू प्रदूषणाचा दर्जा अत्यंत कमी गुणवत्तेचा असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *