तिसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांचा बोलबाला
इंग्लंडची फलंदाजी ढासळली, केवळ ११२ धावात संघ माघारी
अहमदाबाद: भारत-इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. इंग्डल संघाला पहिल्या इंनिंग मध्ये केवळ ११२ धावा काढता आल्या. अक्षर पटेल ने इंग्लंडच्या फलंदाजाला सळो की पळो करून सोडले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानारवर या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. दिवस–रात्र पद्धतीचा हा सामना गुलाबी चेंडूने खेळण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठ्या मैदानात हा सामना सुरु आहे. आजच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन झाले आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. इंग्लंडचा सलामवीर जॅक क्रोलीचे अर्धशकत वगळता इतर फलंदाज फारशी चमक दाखऊ शकले नाही.
इंग्लंड ने टॉस जिंकून पहिले फलंदाजी स्वीकारली. आपल्या कार्यकीर्दीची दुसरी कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटलेने २१.४ षटकात ३८ धावा देत ६ विकेट घेतल्या. तर आर. अश्विन याने ३ विकेट घेतल्या. इशांत शर्मा हा आपला १०० वा कसोटी सामना खेळत असून त्याने १ विकेट मिळवली.