देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
नागपूर: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरासमोरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नागपूर येथील घरासमोरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. घरासमोरील रस्त्यावर बॅरीकेट टाकण्यात आले आहे. तसेच सोमवारी नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
सध्या फडणवीस नागपूर येथे नसतांना सुद्धा त्यांच्या घरासमोरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. इतरवेळी फडणवीस घरी नसतील तर केवळ ३ पोलीस सुरक्षा व्यवस्थेत असतात. मात्र, सध्या त्यांच्या घरासमोर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब राज्यात राजकारण पेटले आहे. यामुळे त्यांच्या घरासमोरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केल्याचे सांगितले जात आहे.