Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचापुणे जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ, प्रशासन हादरलं !

पुणे जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ, प्रशासन हादरलं !

पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादसारख्या जिल्ह्यांत तर कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. यामध्ये पुणे शहराची स्थिती तर अतिशय गंभीर असल्याचं म्हटंल जात आहे.

पुण्यात कोरोग्रस्तांचा आलेख दररोज वाढतच आहे. पुण्यात कोरोनाचा काल स्फोट झालेला पाहायला मिळतोय. काल एकाच दिवसात शहरात २ हजार ५८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येचा आकडा पाहता महापालिका प्रशासन  हादरलं आहे.

यातील ५७३ रुग्णांचे अहवाल मागील काही दिवसांपासून प्रलंबित होते. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याकडे पाहिले, तर पुण्यात कोरोना महामारीची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतंय. पुण्यात दररोज अडीच हजारांच्या पुढे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १ हजारांपेक्षांही कमी आहे. बुधवारी पुण्यात दिवसभरात फक्त ७६९ जण कोरोनातून मुक्त झाले.

पुण्यात कोरोनाचा प्रसार जेवढ्या वेगात वाढतोय; तेवढ्याच प्रमाणात मृतांचा आकडासुद्धा वाढताना दिसतोय. दिवसभरात १६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यातील ५ रुग्ण हे पुण्याच्या बाहेरचे आहेत. मृतांचे प्रमाण असेच राहिले, तर आगामी एक किंवा दोन दिवसांत पुण्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या ४२५ बांधितांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पुण्यात १५०३२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पुणे आरोग्य विभागाकडून कोरोनाला थोपवण्यासाठी कठोर निर्णय घेतले जात आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच विलगीरणावर प्रशासनाकडून जोर देण्यात येतोय. सध्या पुणे प्रशासनाने शहर तसेच जिल्ह्यात वेगवेगळे प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत.

पुणे कोरोना अपडेट  १७ मार्च – बुधवार

– दिवसभरात २५८७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ७६९ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ११ रुग्णांचा मृत्यू ०५ रूग्ण पुण्याबाहेरील.

–  ४२५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २२३७९७

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५०३२

– एकूण मृत्यू – ४९८०

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २०३७८५

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११२३०

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments