कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवले होते? माहिती दिली तर विश्वास अधिक दृढ होईल-जयंत पाटील
मुंबई: बांगलादेश युद्धात आपणही लढा दिला होता. त्यात मला अटक करण्यात आली होती. असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी केला होता. नरेंद्र मोदी यांच्या विधानाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खिल्ली उडविली आहे.
याबाबत जयंत पाटील यांनी ट्वीट करून काही खोचक प्रश्न विचारले आहे. “आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा! मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल” असा टोला सुद्धा पाटील यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते मोदी
बांगलादेशच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनानिम्मित २६ मार्च रोजी मोदी ढाका इथे आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलेच आंदोलन होते. तेव्हा मी २० ते २२ वर्षाचा होतो. त्यावेळी माझ्यासह सहकाऱ्यांनी बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मीही तुरुंगात गेलो होतो अस विधान मोदी यांनी केले होते. त्यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून मोठी टिका होता आहे. जयंत पाटील यांनी सुद्धा त्यांच्या या विधानावर काही प्रश्न उपस्थित केले आहे.