लसीकरणामध्ये सर्वप्रथम गरजूंना प्राधान्य द्यावं

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आहे.

त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर सरसकट सगळ्यांसाठी लसीकरण सुरु करण्याची मागणी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केली. लसीकरणाचा वेग वाढवणं हाच कोरोनावर मात करण्यासाठीचा एकमेव उपाय असल्याची प्रतिक्रिया लहान-मोठे सर्वच व्यावसायिक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लसीचा तुटवडा जाणवत असताना केंद्र सरकारने या लसीचे आतापर्यंत फक्त पाच कोटी डोसच खरेदी केल्याचं समोर आलंय.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना व्हायरस प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त केली आणि राज्याला वाचवण्यासाठी लसीकरणासाठी सर्वांना “आपत्कालीन परवानगी” आवश्यक असल्याचं सूचित केलं. महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी एका वृत्तपत्राला टॅग करत सांगितले की महाराष्ट्र देशाच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र आहे. अधिक दिवस राज्यात लॉकडाऊन टाकल्यास अडचणी वाढतील असेही ते म्हणाले.

६५ वर्षीय आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान कार्यालय आणि आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यांनी लिहीले की, “नवीन प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. हे राज्य देशाच्या आर्थिक उपक्रमांचे केंद्र आहे अधिक लॉकडाऊन लागल्यास देशाची आर्थिक व्यवस्था कमकुवत होऊ शकते. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीस लसीकरणासाठी आपत्कालीन परवानगी आवश्यक आहे “लसींची कमतरता नाही.”

दुसर्‍या ट्वीटमध्ये एका कमेंटला उत्तर देताना आनंद महिंद्रा असंही म्हणालेत कि रँडम टेस्टिंग काळाची गरज असली तरीही लसीकरणाला वेग देणे आवश्यक आहे.

गेल्या आठवड्यात उपमुख्यंमत्री अजित पवार म्हटले होते की १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी पुण्यामध्ये लसीकरण सेंटरची सुरुवात करण्याची परवानगी द्यावी.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *