महाराष्ट्रातही सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार – राज्य सरकारची माहिती

zydus cadila
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : देशात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, आसाम राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
चांगली आणि स्वस्त लस नागरिकांना मिळावी यासाठी जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे.

मोफत लसी करणाची मोहीम राज्य सरकारच्या तिजोरीतून करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे.
कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी होकार दिला होता.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *