Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचामहाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘लॉक’शाही; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्ला

महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘लॉक’शाही; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्ला

पंढरपूर: राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचे त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत सांगितले होते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निम्मिताने मंगळवेढा येथे ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, पण आता लोकशाही ऐवजी लॉकशाही सुरु आहे… म्हणजे लॉकडाऊन.
कधी लॉक करायचे काही अनलॉक करायचे हे सुरु आहे. ठीक आहे हे देखील आवश्यक असते. पण जेव्हा लॉकडाऊन करतो तेंव्हा ज्यांचा रोजगार जातो तेंव्हा त्या लोकांना किमान काही रक्कम आपल्या तिजोरीतून द्यावी. मात्र याच सरकारल कुठलेही भान नाही.
पुन्हा एकदा फडणवीस यांनी हे महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडी सरकार असल्याची टीका केली. तसेच केवळ पैसे खाण्यासाठी एकत्र आले आहेत असा आरोप केला. देशातील सर्वाधिक करोनाबाधित महाराष्ट्रात आढळून येत आहेत. सामान्य नागरिक अडचणीत असतांना सरकारने मदत करायला हवी. त्यामुळे आपण त्यांना मायबाप सरकार म्हणत असतो. अडचणीत असतांना माय बाय मदत करत असतात. मात्र, सामान्य नागरिक अडचणीत असतांना सरकार काहीही मदत करतांना दिसत नाही.
हे सरकार लबाड आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी वीज कापणार नाही अस आश्वासन दिल होत. अधिवेशन संपल्यानंतर वीज कापायला सुरु केली. गावात जर ५ लोकांनी पैसे भरले नाही तर ट्रान्सफार्मर काढून घेत आहेत. इथे सध्या वीज तोडण्यात येत नाही मात्र निवडणूक झाली तर लगेच वीज तोडतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments