| |

कोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: आता कोरोनासोबत युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे. महाराजांच्या काळातील युद्ध करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपले युद्ध सुरु आहे. यासाठी ढाल म्हणजे मास्क असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवजयंतीनिम्मित राज्य सरकारकडून शिवनेरी किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती संभाजीराजे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित  होते. यावेळी ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझ हे दुसर वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळे मिळाला आहे. कोरोना बरोबर युद्ध सुरु आहे. युद्धात मास्क हीच ढाल आहे. गडावर वातावरण छान आहे. पण तोंडावर मास्क असायला हवे असे सांगीतले. जो स्वराज्यावर आला त्याची विल्हेवाट कशी लावली हे सांगायची गरज नाही. अनेक राजे झाले. अनेक लढाया झाल्या… पण छत्रपतींचे वेगळेपण काय तर युध्द जिकण्यासाठीजी जिगर आणि प्रेरणा लागते ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली.

महाराजांना वंदन करण्यसाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात नकळत  शिवरायांचे स्मरण होते. कोरोनाशी लढताना छत्रपतींकडून जिद्द व प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *