दीड वर्षात महाविकासआघाडीच्या ‘या’ दोन मंत्र्यांचा राजीनामा.

मुंबई: अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपनंतर त्यांनी आज गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चेनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला.
देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकार अडचणीत आली होती. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. पण अनिल देशमुख यांचा राजीनामा सरकारने घेतला नव्हता. पण आज अखेर न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.
अनिल देशमुख यांच्याआधी माजी वनमंत्री संजय राठोड यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. संजय राठोड यांच्यावर देखील गंभीर आरोप झाले होते. पुण्यात ७ फेब्रुवारीला वानवडी भागात पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण सोबत राहणाऱ्या अरुण राठोड या तरुणाचे संभाषण सोशल मिडीयावर मोठ्या व्हायरल झाल्यानंतर हा प्रकरणाला खऱ्या अर्थाने तोंड फुटले. माध्यमांनी हे प्रकरण लाऊन धरल्यानंतर विरोधी पक्षाने यात लक्ष घालायला सुरुवात केली आणि या प्रकरणात संजय राठोड यांना आपला राजीनामा द्यावा लागला. महाविकास आघाडीच्या सरकार मधील राजीनामा देणारे संजय राठोड पहिले मंत्री ठरले होते. अशा प्रकारे दीड वर्षात महाविकासआघाडी सरकारमधील आधी शिवसेनेचे संजय राठोड आणि आता राष्ट्रवादीचे अनिल देशमुख अशा २ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.